RCB vs UPW : आरसीबीची विजयी सलामी! रोमांचक सामन्यात युपीचा 2 रन्सने उडवला धुव्वा

Royal Challengers Bangalore vs UP Warriors  : आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 157 धावा केल्या होत्या. त्याला  प्रत्युत्तर देताना युपी वॉरियर्सला 155 धावाच करता आल्या. आरसीबीकडून 20 ओव्हरमध्ये 6 बाद 157 धावा केल्या. तर शोभना आशाने (Sobhana Asha) 5 विकेट्स घेतल्या. 

सौरभ तळेकर | Updated: Feb 24, 2024, 11:09 PM IST
RCB vs UPW : आरसीबीची विजयी सलामी! रोमांचक सामन्यात युपीचा 2 रन्सने उडवला धुव्वा title=
RCB vs UPW, WPL 2024

WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीगचा दुसरा सामना युपी वॉरियर्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (RCB vs UPW) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने युपी वॉरियर्सचा 2 धावांनी धुव्वा उडवला आहे. युपीला अखेरच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती. मात्र, अखेरच्या थ्रिलर ओव्हरमध्ये सोफी मोलिनक्सने (Sophie Molineux) केवळ 8 धावा दिल्या अन् सामना जिंकवला. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 157 धावा केल्या होत्या. त्याला  प्रत्युत्तर देताना युपी वॉरियर्सला 155 धावाच करता आल्या. आरसीबीकडून 20 ओव्हरमध्ये 6 बाद 157 धावा केल्या. तर शोभना आशाने (Sobhana Asha) 5 विकेट्स घेतल्या. तर युपी वॉरियर्सकडून ग्रेस हॅरिसने (Grace Harris) 23 बॉलमध्ये 38 धावांची खेळी केली. तर श्वेता सेहरावतने 31 धावांची मोलाची साथ दिली होती. अशातच आता आरसीबीने लीगमधील पहिला विजय नोंदवला आहे.

युपीचा पहिला पराभव

युपी वॉरियर्सने टॉस जिंकून रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु फलंदाजी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 157 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना युपीची सुरवात देखील खराब झाली. कॅप्टन एलिसा हिली बोल्ड झाली. त्यानंतर वृंदा दिनेशला देखील खास कामगिरी करता आली नाही. तिने 28 बॉलमध्ये 18 धावा केल्या. त्यानंतर ग्रेस हॅरिसने युपीवला सावरलं. तर श्वेता सेहरावतने 31 धावांची भन्नाट खेळी केली. मात्र, शोभना आशाने 17 व्या ओव्हरमध्ये खेळ पालटला. 17 व्या ओव्हरमध्ये तीन विकेट्स आरसीबीच्या गळाला लागले. शोभना आशाने 4 ओव्हरमध्ये फक्त 22 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. मात्र, अखेरच्या ओव्हरपर्यंत सामना रंगला अन् युपीला विजयाच्या दोन धावा कमी पडल्या.

आरसीबीची फलंदाजी ढेपाळली

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु कडून रिचा घोषने 37 चेंडूत 62 धावांची दमदार खेळी केली. तर सबिनेनी मेघनाने 44 चेंडूत 53 धावांची खेळी केली. मेघनाने 7 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकार मारला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तिसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. सोफी डिव्हाईन 5 चेंडूत एक धाव काढून बाद झाली. कर्णधार स्मृती मानधना 11 चेंडूत 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलीच. रिचा घोषने युपीच्या बॉलर्सला धुतलं अन् आरसीबीची लाज राखली. सोफी 9 धावा केल्यानंतर नाबाद राहिली आणि श्रेयंका 8 धावा केल्यानंतर नाबाद डगआऊटमध्ये परतली. युपीकडून राजेश्वरी गायकवाडने दोन विकेट्स घेतल्या.

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅक्ग्रा, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, किरण नवगिरे, वृंदा दिनेश, पूनम खेमनार, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, सायमा ठाकुर.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, शोभना आशा, रेणुका ठाकूर सिंग.