IPL 2024 MI vs RR : आयपीएल 2024 च्या 14 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरूद्ध (Mumbai Indians vs Rajasthan Royals) दमदार प्रदर्शन केलं. या मॅचमध्ये रियान परागच्या 54 धावांच्या खेळीमूळं राजस्थान वानखेडेच्या मैदानावर मुंबईपेक्षा वरचढ ठरलीये. या विजयामुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 मध्ये सलग तिसरा विजय नोंदवला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सची सुमार कामगिरी पहायला मिळाली. पण या विजयापेक्षा जास्त चर्चा तर रियान परागने आपल्या सोशल मिडियीवर टाकलेल्या पोस्टची होतेय, रियान परागने (Riyan Parag) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मॅचनंतर एक पोस्ट टाकलीये, ज्यामध्ये रियान पराग हा आपल्या आईसोबत पहायला मिळत आहे.
परागने पोस्ट केला व्हिडिओ
रियान परागने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, रियान परागची आई राजस्थानच्या खेळाडूंची हॉटेलमध्ये वाट पाहत आहे, यानंतर जेव्हा पराग हा हॉटेलमध्ये एन्ट्री मारतो तेव्हा, त्याची आई परागला घट्ट मिठी मारते आणि त्याच्या बॅगमधून ऑरेंज कॅप काढून परागच्या डोक्यावर घालते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये परागने लिहिले की, 'तुमच्या आईपेक्षा जास्त प्रेम तूमच्यावर दुसरं कोणीही करू शकत नाही'.
No one loves you like your mom does. pic.twitter.com/oaWC2SYR47
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 1, 2024
हा व्हिडिओ पाहून अनेक फॅन्सने या पोस्टखाली परागसाठी काही खास मॅसेज लिहिले आहेत, या व्हिडिओने केवळ सात तासात तब्बल 2.6 मिलियन व्यूझ पूर्ण केले आणि विशेष गोष्ट म्हणजे भारतीय स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) पण या पोस्टवर 'मोमेंट हे' असं कॉमेंट केलं आहे. खूप सारे लोक या व्हिडोओला इमोशनली रिअॅक्ट करताय, तर या व्हिडिओला खूप साऱ्या क्रिकेट फॅन्सचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.
दरम्यान, आयपीएल 2024 ची 14 वी मॅच जिंकत राजस्थान रॉयल्स ही पॉईंट्स टेबलच्या टॉपला पोहोचलीये, यानंतर राजस्थान रॉयल्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचे आव्हान असणार, हा सामना 6 एप्रिल रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
राजस्थानचा संघ - यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद शर्मा, संदीप शर्मा , नवदीप सैनी, केशव महाराज, टॉम कोहलर-कॅडमोर, डोनोवन फरेरा, कुणाल सिंग राठौर.