मुंबई : आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सची कामगिरी यंदाच्या सिझनमध्ये फार खराब आहे. मुंबईला सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 5 वेळा आयपीएलचा खिबात जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि कर्णधार रोहित शर्माला सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. मात्र अशा कठीण परिस्थितीतही रोहित शर्माला आपली टीम आणि खेळाडूंच्या मागे भक्कमपणे उभा राहिला आहे.
15 व्या सिझनमध्ये सलग 3 पराभवानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स 9 व्या क्रमांकावर आहे. असं असतानाही हिटमॅन रोहित शर्माने टीमचं विश्वास वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलंय. याचा व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीयो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीयोमध्ये कर्णधार रोहित शर्मा टीमच्या इतर खेळाडूंना महत्त्वाचा मेसेज देतोय. रोहित म्हणतो, आपण कोणाला जबाबदार ठरवू शकत नाही. यामध्ये आपण सर्व एकत्र आहोत, आपण एकत्र जिंकतो आणि पराभवंही एकत्रंच स्विकारतो.
Skipper’s message to the entire team #OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #KKRvMI @ImRo45 pic.twitter.com/msWmXrUJD4
— Mumbai Indians (@mipaltan) April 7, 2022
रोहित शर्मा पुढे म्हणाला, आपण टूर्नामेंटमधील 3 सामने हरलो याचा अर्थ असा नाही की आपण मान खाली घातली पाहिजे. कारण आता टूर्नामेंटमध्ये सुरुवातीचे दिवस आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार आणि 2013 पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबईच्या खराब सुरुवातीनंतर आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करताना दिसला.