World Cup 2023: क्रिकेट चाहते ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो दिवस अखेर आज आला आहे. आजपासून क्रिकेटचा वनडे वर्ल्डकप सुरु होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारत एकट्याने वर्ल्डकपचं आयोजन करतोय. यापूर्वी भारताने शेजारील देश बांगलादेश आणि श्रीलंकेसह 2011 वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन केलं होतं. दरम्यान टीम इंडियाही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली प्रथमच वनडे विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज आहे. मात्र यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाला सोडून गेल्याचं समोर आलं.
5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 चा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. टीम इंडिया 8 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया चेन्नईला पोहोचलीये. मात्र यावेळी रोहित शर्मा टीमसोबत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आजपासून वनडे वर्ल्डकपला सुरुवात होणार असून 4 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये वर्ल्ड कप 2023 साठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्व देशांचे कर्णधार उपस्थित राहिले होते. अशा परिस्थितीत रोहित शर्माही टीम इंडियाला पत्रकार परिषदेसाठी अहमदाबादला पोहोचला होता. यावेळी कर्णधााराचं वर्ल्डकपच्या ट्रॉफीसोबत फोटोशूटंही करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर रोहित शर्मा टीम इंडियासोबत जोडला जाणार असल्याची माहिती आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना रोहित शर्मा म्हणाला, वर्ल्डकपच्या टीमचं नेतृत्व करण्यासाठी मी उत्साहित आहे. मला माहित आहे की, स्पर्धेपूर्वी दबाव असेल, परंतु मुद्दा त्यावर मात करण्याचा आहे. टीममधील सर्व सदस्यांना त्या दबावातून जाण्याची सवय आहे. दबाव ही अशी गोष्ट आहे जी खेळाडूला सोडत नाही. जोपर्यंत तुम्ही खेळ खेळता तोपर्यंत दबाव कायम राहील. त्यामुळे ते बाजूला ठेवा, कामावर लक्ष द्या.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, के. एल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव.