Team India: टीम इंडिया येत्या काळात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियाला टी-20 आणि वनडे सामने खेळायचे आहेत. 2 ऑगस्टपासून भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. अशातच बीसीसीआयने वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यावेळी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तर उप कर्णधार पदाची धुरा युवा खेळाडू शुभमन गिलच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
श्रीलंकेच्या दौऱ्यावर वनडेमधून वरिष्ठ खेळाडूंना आराम देणार का असा प्रश्न समोर येत होता. मात्र आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा श्रीलंकेविरूद्धच्या वनडे सिरीजमध्ये समावेश करण्यात आला आहे. यावेळी टीमच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तर विराट कोहली देखील श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी केवळ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या सिरीजमधून आराम देण्यात आला आहे.
यावेळी वनडे टीमसाठी उपकर्णधार कोण असणार अशी चर्चा जोर धरत होती. यावेळी वनडे टीमच्या उपकर्णधारपदाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. श्रीलंकेविरूद्धच्या वनडेमधून हार्दिक पंड्याने यापूर्वीच माघार घेतली होती. त्यामुळे उपकर्णधार कोण होणार हा प्रश्न सर्वांसमोर होता. टी-20 फॉर्मेटमध्येही शुभमन गिलच्याच खांद्यावर उपकर्णधार पदाची धुरा सोपण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा