Sara Tendulkar : महान फलंदाज सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. सारा इंस्टाग्रामवर (Instagram)लोकप्रिय असून तिचे 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. नेहमी लाईमलाईटपासून दूर राहणारी सारा तेंडुलकर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर साराचे काही फोटो व्हायरल होताना दिसतायत. 

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सारा तेंडुलकर पार्टी करताना दिसतेय. दरम्यान हे फोटो पाहताच सर्वांच्या नजरा फोटोमध्ये असलेल्या मुलावर खिळल्या आणि सोशल मिडीयावर या मिस्ट्री बॉयबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. सारासोबत असलेला हा मुलगा नेमका कोण याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

कोण आहे तो मिस्ट्री बॉय?

सारा तेंडुलकरबरोबर फोटोत दिसणारा हा मिस्ट्री बॉय हा ओरी या नावाने प्रसिद्ध आहे. मुळात त्याचं पूर्ण नाव ओरहान अवात्रामणी असं आहे. दरम्यान पार्टीचे हे फोटो लंडनमधील असल्याचं समोर येतंय. ओरी याची बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत ओळख असल्याचं समोर आलंय. त्याचे अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण, जान्हवी कपूर यांच्यासोबतचे फोटोही व्हायरल झाली आहे.

सारा तेंडुलकर सध्या लंडनमध्ये शिक्षणासाठी आहे. लंडनमध्ये ती शिक्षणासोबत मॉडेलिंग क्षेत्रातही ती पुढे येत असल्याचं दिसून येतंय. यापूर्वी साराने काही प्रसिद्ध प्रसिद्ध ब्रँडसाठी जाहिरात देखील शूट केली होती. 

काही दिवसांपूर्वी टीम इंडियामधील तरूण खेळाडू शुभमन गिलचं नाव सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं होतं. मात्र त्यानंतर शुभमन गिल हा सारा अली खानला डेट करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर या दोघांचं नाव एकमेकांशी जोडंल जात होतं.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar Weekend Party Pics with Mistry Boy Gone Viral Marathi News
News Source: 
Home Title: 

Sara Tendulkar चे पार्टीतील फोटो व्हायरल; सचिनच्या लेकीसोबत असलेला तो 'मिस्ट्री बॉय' कोण?

Sara Tendulkar चे पार्टीतील फोटो व्हायरल; सचिनच्या लेकीसोबत असलेला तो 'मिस्ट्री बॉय' कोण?
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Sara Tendulkar चे पार्टीतील फोटो व्हायरल; सचिनच्या लेकीसोबत तो 'मिस्ट्री बॉय' कोण?
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, November 28, 2022 - 18:34
Request Count: 
1
Is Breaking News: 
No