Sanju Samson On Selection : वर्ल्ड कप 2023 मधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) नव्या चेहऱ्यांना संधी दिली अन् टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची (T20 World Cup 2024) तयारी सुरू केलीये. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) यंग ब्रिगेडमध्ये तडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) संजूला रेड अलर्ट दिलाय का? असा सवाल विचारला जातोय. गेल्या वर्षभरापासून चांगल्या प्रदर्शनानंतर देखील संजूला डच्चू दिला जातोय. अशातच आता स्वत: संजू सॅमसनने यावर विधान केलं आहे.
एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजू सॅमसन याने सिलेक्शनवर बोलला आहे. लोक मला अनलकी आणि दुर्देवी खेळाडू म्हणतात. मी सध्या जिथं पोहोचलो आहे, ते माझ्या विचारांपैक्षा जास्त आहे. मी कुठं अनलकी क्रिकेटर आहे असं तुम्हीच म्हटलं तर कसं होणार? मी आता ज्या स्तरावर पोहचलो आहे. तेथे पोहचण्याचा मी विचार देखील केला नव्हता, असं संजू सॅमसन याने म्हटलं आहे. त्यावेळी त्याने रोहित शर्मावर देखील मोठं वक्तव्य केलंय.
Sanju Samson : संजू सॅमसनचं करियर संपलं? बीसीसीआयने पुन्हा दिला 'रेड अलर्ट'
माझं सिलेक्शन न झाल्याबद्दल माझ्याशी बोलणारा रोहित शर्मा हा पहिला किंवा माझ्या मते दुसरा व्यक्ती होता. रोहित आणि माझ्यात बोलणं झालं. त्याने माझ्या मानसिक परिस्थितीची चौकशी केली. तू आयपीएलमध्ये चांगला खेळला आहेस. तू मुंबई इंडियन्सविरुद्ध देखील मोठमोठे सिक्स मारले आहेत. तू चांगली फलंदाजी देखील केली आहेस. त्यामुळे नाराज होऊ नको, असं म्हणत त्याने मला सपोर्ट केला, असं संजू सॅमसन याने (Sanju Samson On Rohit Sharma) म्हटलं आहे.
Sanju Samson Latest interview #SanjuSamson pic.twitter.com/hJWSrzwr3U
— Joel (@Crickfootboi11) November 23, 2023
दरम्यान, संजूसाठी आता सर्व दरवाजे बंद झालेत का? असा सवाल विचारला जात आहे. आशिया कपमध्ये संजूला संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर एशियन गेम्स आणि वर्ल्ड कपमधून देखील संजूला बाहेर ठेवण्यात आलं होतं. अशातच आता संजू सॅमसनला पुन्हा संधी मिळू शकते याचे संकेत मिळाले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी नुकतीच मुंबईत संजू सॅमसनशी चर्चा केली.