मृत्यूसंदर्भातील शेन वॉर्न शेवटचं ट्विट का होतंय व्हायरल?

निधनाचा शोक व्यक्त करणारं वॉर्नचं हे शेवटचं ट्विट होतं.

Updated: Mar 5, 2022, 07:58 AM IST
मृत्यूसंदर्भातील शेन वॉर्न शेवटचं ट्विट का होतंय व्हायरल? title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. शेन वॉर्नचं  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान याच परिस्थितीत आता शेन वॉर्नचं शेवटचं ट्विट व्हायरल होतंय. निधनाचा शोक व्यक्त करणारं वॉर्नचं हे शेवटचं ट्विट होतं.

4 मार्च रोजी सकाळी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रॉड मार्श यांचं निधन झालं होतं. याचसंबंधी शेन वॉर्नने रॉड मार्श यांच्यासंबंधी ट्विट केलं होतं. रॉड मार्श यांच्या निधनाची बातमीने दुःख झाल्याचं वॉर्नने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय.

वॉर्न त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, "ते आमच्या महान खेळाचे लेजंड होते त्याचप्रमाणे अनेक तरूणांसाठी ते प्रेरणा होते. रॉड यांना क्रिकेटबद्दल फार आपुलकी होती. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेटला खूप काही दिलंय. रेस्ट इन पीस सहकारी." यासोबत त्याने हार्टचं इमोजी देखील जोडलं होतं.

शेन वॉर्नची क्रिकेट कारकिर्द 

शेन वॉर्नने 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. वॉर्नने 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नने 37 वेळा 5 विकेट्स तर 10 वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एका कसोटी सामन्यात 128 धावा देऊन 12 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती.  

तर 194 वनडे मॅचमध्ये त्याने 293 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. वॉर्नची वनडेमधील 33 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती.

आयपीएलमधील कामगिरी

शेन वॉर्नने आपल्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सला आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवून दिलं होतं. वॉर्न आयपीएलमध्ये 55 मॅचमध्ये 57 विकेट्स घेतल्या होत्या.