दुबई : शिखर धवनने शेवटच्या काही सामन्यांमध्ये खूपच खराब कामगिरी केली होती. पण आयपीएल 2020 च्या महत्त्वाच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या संघासाठी त्याने महत्त्वाची कामगिरी केली. या सामन्यात धवनने 50 बॉलमध्ये 78 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान त्याने 2 सिक्स आणि 6 फोर मारले. त्याचा स्ट्राईक रेट 156.00 इतका होता. या सामन्यात धवनने स्टोइनिससह चांगली सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली.
धवनने आयपीएल 2020 मध्ये 600 धावा पूर्ण केल्या. आयपीएलच्या हंगामात दिल्लीसाठी 600 किंवा त्याहून अधिक धावा करणारा धवन दुसरा फलंदाज ठरला आहे. धवनपूर्वी 2018 मध्ये दिल्लीच्या फलंदाज ऋषभ पंतने ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. आयपीएलच्या हंगामात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दोनदा 600 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत, तर धवन आणि पंत सोडून सचिन तेंडुलकर, रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू यांनी एकदा ही कामगिरी केली आहे.
एवढेच नव्हे तर शिखर धवनने या मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा मान देखील मिळविला. या मोसमात त्याने आतापर्यंत 603 धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने 2012 मध्ये सर्वाधिक 569 धावा केल्या होत्या. त्याशिवाय धवनने 43 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे, त्याने 52 वेळा हे आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, तर विराट कोहलीने 44 वेळा ही कामगिरी केली आहे. शिखर धवन आता तिसर्या क्रमांकावर आहे.
हैदराबादविरुद्ध शिखर धवनच्या 78 रनच्या खेळीमुळे दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमवत 189 धावा केल्या. या सामन्यात धवन व्यतिरिक्त स्टॉयनिसने दिल्लीकडून 38 धावा, श्रेयस अय्यरने 21 धावा तर हेटमायरने 22 बॉलमध्ये नाबाद 42 धावा केल्या.