Video: 'छोटी बच्ची हो क्या', म्हणत प्रिती झिंटावर खदाखदा हसला 'हा' क्रिकेटपटू

टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज, आणि पंजाबचा 'गब्बर' शिखर धवन (Shikhar Dhawan)सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर सुद्धा तो चर्चेत येताना दिसतोय.  

Updated: May 11, 2022, 06:14 PM IST
Video: 'छोटी बच्ची हो क्या', म्हणत प्रिती झिंटावर खदाखदा हसला 'हा' क्रिकेटपटू title=

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज, आणि पंजाबचा 'गब्बर' शिखर धवन (Shikhar Dhawan)सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर सुद्धा तो चर्चेत येताना दिसतोय.  

नुकताच त्याने इन्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या  व्हिडिओ तो पंजाब संघाची मालकीन प्रीती झिंटाला (Preity Zinta)'छोटी बच्ची हो क्या' म्हणताना दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत असून यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.  

शिखर धवनने नुकताच आपला वर्कआऊट सेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो पंजाब संघाची (Punjab kings) मालकिण प्रीती झिंटासोबत वर्कआऊट करतोय. यामध्ये दोघेही एकमेकांची कंपना एन्जॉय करत जिमचा आनंद घेतायत. या क्षणांच्या व्हिडीओमध्ये बॅग्राऊंडला 'छोटी बच्ची हो क्या' हे गाणं वाजतेय. सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय.  

शिखर धवन (Shikhar Dhawan) हा (IPL 2022) च्या लिलावात खरेदी केलेला पहिला खेळाडू होता. धवनला पंजाब किंग्जने मेगा लिलावात 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यामुळे या हंगामात सुद्धा तो पंजाबकडूनच खेळतोय. शिखर धवन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पंजाब किंग्जसाठी 11 सामन्यांमध्ये 42.33 च्या सरासरीने 381 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकी खेळींचा समावेश आहे.

रेकॉर्डस
धवनने आतापर्यंत 203 आयपीएल सामन्यांमध्ये 35.22 च्या सरासरीने 6165 धावा केल्या आहेत. यादरम्यान धवनने  2  शतक आणि 47 अर्धशतके झळकावली.