IND vs ENG, Shreyas Iyer: सध्या इंग्लंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आहे. या ठिकाणी 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीज खेळायच्या आहेत. या सिरीजमधील 2 सामने झाले असून दोन्ही टीम्सने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. उर्वरित 3 सामन्यांसाठी लवकरच टीम इंडियाची ( Team India ) घोषणा करण्यात येणार असून यापूर्वी टीमला मोठा धक्का बसलाय. तिन्ही सामन्यांमधून टीममधील मिडल ऑर्डरचा फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. अशातच आता श्रेयस अय्यरच्या जागी टीममध्ये कोणाला संधी मिळू शकते हे पाहूयात.
मिडल ऑर्डरचा फलंदाज श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer ) जागी सरफराज खानला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सरफराज खानला दुसऱ्या टेस्टमध्ये रिप्लेसमेंट म्हणून टीममध्ये जागा मिळाली होती. त्यामुळे अय्यरच्या ( Shreyas Iyer ) दुखापतीमुळे सरफराज खानला संधी दिली जाऊ शकते.
इंग्लंड विरूद्धच्या सिरीजपूर्वीच टीम इंडियातील ( Team India ) खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलं होतं. यामध्येच आता श्रेयस अय्यरची ( Shreyas Iyer ) भर पडली होती. या सिरीजमधील पहिल्या सामन्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांना दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. दुखापतीमुळे हे दोन्ही खेळाडू टीमबाहेर गेले होते. हे दोन्ही खेळाडू पुढच्या सामन्यांसाठी टीम इंडियाचा ( Team India ) भाग असणार की नाही याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.
दरम्यान इंग्लंडविरूद्धच्या पुढच्या सामन्यांमध्ये विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या खेळण्याबाबतही काही स्पष्ट कऱण्यात आलेलं नाही. कोहलीने पहिल्या दोन टेस्टमधून आपलं नाव मागे घेतलं होतं. तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे पहिल्या दोन टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाचा भाग होऊ शकला नाही. अशातच आता उर्वरित 3 टेस्टसाठी तो टीम इंडियाचा ( Team India ) भाग असेल की नाही याबाबत काहीही स्पष्ट झालेलं नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये दोन सामने खेळले गेले आहेत. इंग्लंडने पहिली टेस्ट जिंकून सुरुवात केली. त्यानंतर भारताने कमबॅक केलं आणि दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 106 रन्सने पराभव झाला. आता सिरीजमधील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडियाला ( Team India ) सिरीज जिंकायची असेल तर पुढच्या सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे.