Shubman Gill : टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल ( Shubman Gill ) सध्या चांगलाच चर्चेत आहे. तर आता शुभमन लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. शुभमन ( Shubman Gill ) फिल्मी जगताशी जोडला जाणार असून त्याचं कनेक्शन आता थेट हॉलिवूडशी ( Hollywood ) जोडलं जाणार आहे. आता शुभमन गिलच्या रूपाने स्पायडर मॅन ( Spider - Man ) तुमच्या घरी येणार आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, पाहुयात.
शुभमन गिल 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर वर्स' ( Spider - Man : Across the Spider - Verse ) मध्ये इंडियन स्पायडर मॅनसाठी आपला आवाज देणार आहे. अर्थात डबिंग करणार आहे. सोमवारी चित्रपटाच्या प्रोड्यूसरकडून याची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात इंडियन स्पायडर मॅनची भूमिका पवित्र प्रभाकर साकारणार आहे. चाहत्यांना या सिनेमाची फार उत्सुकता लागलीये. तर दुसरीकडे आता क्रिकेटप्रेमी देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत.
शुभमन गिल ( Shubman Gill ) पंजाबी आणि हिंदी सिनेमासाठी स्वतःचा आवाज देणार आहे. सोनी पिक्चर्स इंटरटेनमेंट इंडिया द्वारे हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिल ( Shubman Gill ) म्हणाला की, स्पायडर मॅन हा सर्वात विश्वासू सुपरहिरो पैकी एक मानला जातो.
या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच भारतीय स्पायडर-मॅन पडद्यावर दिसणार आहे. भारतीय स्पायडर-मॅनला हिंदी आणि पंजाबी भाषांमध्ये आवाज देणं हा माझ्यासाठी खूप छान अनुभव आहे. यासाठी मी फार उत्सुक असून मला छान वाटतंय. या सिनेमाच्या रिलीजची मी आतुरतेने वाट पाहत, असल्याचं शुभमन गिलने ( Shubman Gill ) म्हटलं आहे.
येत्या 2 जून रोजी 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-वर्स' सिनेमा विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी, अंग्रेजी, हिंदी, तमिल, तेलुगु, कन्नड़, मल्याळम, गुजराती, पंजाबी आणि बंगाली या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. चाहते या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहतायत.
रविवारी गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात शुभमन गिलने ( Shubman Gill ) चांगली खेळी केली. या सामन्यामध्ये गिलने 94 रन्सची नाबाद खेळी केली. अवघ्या 6 रन्सने शुभमन गिलचं शतक हुकलं. त्याच्या या खेळीमध्ये गिलने 2 फोर तर 7 उत्तुंग सिक्स लगावले होते. अखेरीस या सामन्यात गुजरातचा विजय झाला.