World Cup 2023: इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीकडून (ICC) आयोजित केल्या जाणारा यंदाचा वनडे वर्ल्ड कप (World Cup 2023) भारतात खेळवला जाणार आहे. वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलंय. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2011 प्रमाणे भारत घरच्या मैदानावर वर्ल्ड कर जिंकणार का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता टेस्ट फायनल (WTC Final 2023) सुरू असताना अचानक एका टीमची घोषणा झाली आहे.
श्रीलंकेचा (Sri Lanka) क्रिकेट संघ यंदा थेट वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे त्यांना पात्रता फेरीतील सामने खेळावे लागणार आहेत. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे. अशातच आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने विश्वचषक पात्रता फेरीसाठी संघाची घोषणा केली आहे.
आणखी वाचा - खचलेल्या टीम इंडियामध्ये विराटने भरला जोश; कांगारूंचा खेळ खल्लास
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची स्टार गोलंदाज असलेल्या मथिशा पाथिरानाला (Mathisha Pathirana) संघात स्थान मिळालंय. तर दासुन शनाका (Dasun Shanaka) याला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. त्यामुळे आता मागील काही दिवसांपासून चांगली कामगिरी करणारा श्रीलंका वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
IPL star included in Sri Lanka squad for ICC Men's @cricketworldcup Qualifier https://t.co/eQKiu4vUWA
— ICC (@ICC) June 9, 2023
न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही 2023 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. तसेच यजमानपद असल्याने भारत देखील पात्र ठरला आहे.
आगामी वर्ल्ड कपसाठीच्या पात्रता फेरीत दहा संघ असतील. अ गटात वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, नेदरलँड, नेपाळ आणि अमेरिका यांच्या संघाचा समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान आणि यूएईचे संघ आहेत. यातील एक-एक संघ वर्ल्ड कप खेळण्यासाठी पात्र ठरतील.
दासुन शनाका (C), कुसल मेंडिस, दिमुथ करुणारत्ने, पथुम निसंका, चरित असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, वानिंदु हसरंगा, चामिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, कसुन राजिथा, लाहिरू कुमारा, महेश थिक्षणा, मतीशा पथिराना, दुशान हेमंथा.