Rohit Sharma Welcome Baby Boy : भारताचा टेस्ट आणि वनडे कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिने 15 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्यांदा बाबा झाला असून त्याच्यावर सध्या सर्वस्थरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. कर्णधार रोहितने मुलाच्या जन्माची गोड बातमी दिल्यावर टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी आनंद व्यक्त करत अजून एक नवा क्रिकेटर आल्याचे म्हटले आहे.
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकायांच्यात शुक्रवारी टी 20 सीरिजचा शेवटचा सामना पार पडला. वांडरर्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात टीम इंडियाने 135 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने 4 सामन्यांची टी 20 सीरिज 3-1 अशी आघाडी घेऊन जिंकली. यात टीम इंडियाचे नेतृत्व हे सूर्यकुमार यादवने केले होते. यात भारतीय फलंदाजांपैकी संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी नाबाद धावा केल्या. संजूने 56 बॉलमध्ये 109 तर तिलकने 47 बॉलमध्ये 120 धावा केल्या.
हेही वाचा : दुसऱ्यांदा बाप झाल्यावर रोहित शर्माने केली पहिली पोस्ट, फोटो शेअर करून दिली गुडन्यूज
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका शेवटच्या टी 20 सामन्यानंतर सूर्याने मॅच विनर खेळाडू तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांच्याशी संवाद साधला. यावेळी सूर्याने सर्वांना रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्याची बातमी दिली. यावेळी तिलक वर्मा म्हणाला, 'रोहित भाई आम्हाला खूप खूप आनंद झालाय. एखाद दिवस उशीर झाला असता तर मी तिथे तुमच्या आनंदात सहभागी झालो असतो. पण मी आता लवकरच गोंडस बाळाला बघण्यासाठी येतोय'. सूर्यकुमारने म्हटले की, 'आता आम्हाला सुद्धा छोटा साईड आर्म, छोटे छोटे पॅड्स सगळे घेऊन जावं लागेल. कारण आता अजून एक नाव क्रिकेटर आला आहे'.
Jersey number secret, hairdo and a special message for #TeamIndia Captain @ImRo45
Skipper SKY interviews &39;Humble&39; centurions IamSanjuSamson & TilakV9
WATCH SAvIND | surya_14kumar
— BCCI (BCCI) November 16, 2024
2015 रोजी क्रिकेटर रोहित शर्मा याने त्याची मॅनेजर आणि मैत्रीण असलेल्या रितिका सजदेहशी लग्न केले. त्यानंतर या जोडप्याला 2018 मध्ये गोंडस मुलगी झाली जिचे नाव समायरा असे ठेवण्यात आले. रोहित नई रितिकाने आता दुसऱ्या मुलाच्या जन्माविषयी खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्याने लिहिले की, 'family the one where we are four' म्हणजे एक कुटुंब जेथे आम्ही चौघे आहोत. भारतीय टेस्ट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तिथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअंतर्गंत पाच टेस्ट मॅचची सिरीज खेळणार आहे. पहिला सामना 22 नोव्हेंबर रोजी पर्थमध्ये खेळला जाणार आहे. रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता घरात बाळाचे आगमन झाल्यानंतर तो पर्थ टेस्टमध्ये खेळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.