मुंबई : T20 विश्वचषक सुरु होण्याआधी सगळ्यांनाच असे वाटत होते की, ही ट्रॉफी जिंकण्यासाठी भारत हा प्रबळ दावेदार आहे. परंतु आता या सिरीजमध्ये टीम इंडियाची कामगीरी पाहाता टीमला सेमीफायनलमध्ये पोहोचने देखील कठीण झाले आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडला त्यांच्या पहिल्या सलग दोन सामन्यांमध्ये वाईट रीतीने पराभूत झाल्यानंतर भारताने 2021 च्या टी20 विश्वचषकातून जवळपास बाहेर ढकलले होते.
अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंडला पराभूत करून विजयाची नोंद करावी अशी प्रार्थना आता भारताला करावी लागेल, परंतु असे असतानाही त्यांना निव्वळ रन रेटचीही काळजी घ्यावी लागेल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात उद्या 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता टी-20 विश्वचषक सामना रंगणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात ऋषभ पंतची कामगिरी अत्यंत खराब होती. अशा स्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतची जागा हिरावून घेतली जाऊ शकते.
ऋषभ पंतची गेल्या काही महिन्यांतील कामगिरी खराब आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियामध्ये असे 2 विकेटकीपर आहेत, जे ऋषभ पंतची जागा घेऊ शकतात आणि त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतात.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय चाहते दु:खी झाले आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या पुढील T20 विश्वचषक सामन्यात ऋषभ पंतची जागा घेऊ शकणारे दोन खेळाडू भारता आहेत. ज्यांना त्याच्या बदली विकेटकीपिंग दिली जाऊ शकते.
टीम इंडियाचा युवा खेळाडू ईशान किशन फलंदाजीसोबतच विकेटकीपिंगमध्ये माहिर आहे. ईशान किशनला न्यूझीलंडविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये फलंदाज म्हणून संधी मिळाली, पण अफगाणिस्तानविरुद्ध त्याला विकेटकीपर म्हणून संधी मिळू शकते.
ईशान किशनचा फॉर्म पाहता पुढील सामन्यात ऋषभ पंतच्या जागी तो सर्वोत्तम खेळाडू ठरेल. तर ऋषभ पंतला वगळून दुसऱ्या गोलंदाज किंवा फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते.
यंदा मुंबई आयपीएलच्या प्लेऑफसाठी पात्र ठरू शकली नाही, पण शेवटच्या साखळी सामन्यात ईशान किशनने कमाल केली. शेवटच्या साखळी सामन्यात जेव्हा मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला होता. हा करा किंवा मरो असा सामना होता, ज्यात मुंबई इंडियन्सला 170 धावांचे टार्गेट होते.
मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचता आले नाही पण इशान किशनच्या बॅटने या सामन्यात चांगलाच कहर केला. या सामन्यात इशानने केवळ 32 चेंडूत 84 धावा केल्या. इशान किशनची ही धमाकेदार खेळी पाहून सगळेच थक्क झाले.
आगामी काळात ईशान किशन ऋषभ पंतची जागा घेऊ शकतो आणि एकहाती सामना फिरवू शकतो. अशी अपेक्षा आहे.
भारतीय क्रिकेट संघात विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर जर कोणत्या फलंदाजची बॅट बोलत असेल, तर तो स्टार खेळाडू केएल राहुल आहे.
गेल्या एक वर्षापासून केएल राहुलने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात आपले स्थान पक्के केले आहे. एवढेच नाही तर केएल राहुललाही यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आणि त्याने अप्रतिम कामगिरी केली. केएल राहुलने दाखवून दिले आहे की, ज्यामध्ये तो फलंदाजासोबतच विकेटकीपर म्हणूनही संघात स्थान मिळवू शकतो. त्याने आता ऋषभ पंतसाठी मोठे आव्हान उभे केले आहे. ऋषभ पंतच्या जागी केएल राहुलही सर्वोत्तम खेळाडू आहे.