Naseem Shah tears after Defeat by India: रविवारी भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला. आणि या सामन्याने टीम इंडियाने हरलेली बाजी जिंकत पाकिस्तानचा पराभव केला आहे. ६ रन्सने भारताने पाकिस्तानवर मात केली असून हा टीम इंडियाचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय होता.
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.पाकिस्तानच्या पराभवानंतर एक मैदानावर एक मोठी घटना घडली. यावेळी पाकचा खेळाडू नसीम शाह पराभव पचवणं कठीण गेलं आणि त्याला अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
भारत विरूद्ध पाकिस्तान या अटीतटीच्या सामन्यात जवळपास टीम इंडिया हरण्याच्या मार्गावर होती. मात्र भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. पाकिस्तानला शेवटच्या 3 चेंडूत 16 धावा काढण्याची गरज होती. यावेळी ही जबाबदारी पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहवर होती. यावेळी नसीमनेही सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु यश मिळालं नाही. त्याने शेवटच्या चेंडूपूर्वी चौकार मारला आणि नंतर कट शॉटने दुसरा रन घेतला. पण तोपर्यंत उशीर होऊन भारताचा विजय निश्चित झाला.
शेवटच्या बॉलवर अर्शदीप सिंगच्या यॉर्करसमोर नसीमला चांगला शॉट खेळता आला नाही. यावेळी भारताच्या विजयाने नसीम शाह भावूक होऊन रडू लागला. दोन वर्षांपूर्वी आशिया कप स्पर्धेत सलग सिक्स ठोकून पाकिस्तानला विजयापर्यंत नेणारा नसीम यावेळी टीमला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. भारताविरूद्ध झालेल्या पराभवानंतर पव्हेलियनमध्ये परतत असताना नसीमच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्याचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.
पाकिस्तानकडून त्याला साथ देणारा शाहीन आफ्रिदी क्रिझवर होता. शाहीन आफ्रिदीने नसीमना मिठी मारून त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
पाकिस्तान टीमकडून नसीम शाहने शानदार गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीपुढे भारतीय टीमच्या फलंदाजांनी गुडघे टेकल्याचं दिसून आलं. नसीमने 4 ओव्हर्संमध्ये 5.25 च्या इकॉनॉमीने 21 रन्स देत 3 विकेट्स घेतले.
Even Naseem Shah, our young bowler, played better than our highly paid batsmen. The time has come, if you’re not performing well, please resign gracefully and let others join. It’s time to take strict decisions, or they’ll never understand. #PakvsIndpic.twitter.com/kkV9LZntFX
— Saad Kaiser (@TheSaadKaiser) June 9, 2024
Rohit Sharma appreciating the efforts of Naseem Shah after the match. He asked him to not cry. What a moment #T20WorldCup #PAKvsIND #INDvsPAK #tapmad #HojaoADFree pic.twitter.com/YNnLEbra8h
— Farid Khan (@_FaridKhan) June 9, 2024
टीम इंडियाने दिलेलं 120 रन्सचं किरकोळ आव्हान पाकिस्तानसाठी होतं. पाकिस्तानचे ओपनर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी चांगली सुरूवात करून दिली. भारताला झटपट विकेट्सची आवश्यकता होती. बुमराहने पहिली विकेट काढून दिली अन् भारतीय खेळाडूंनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर रिझवानने एक बाजून सांभाळून ठेवली होती. 15 व्या ओव्हरमध्ये बुमराहने पुन्हा रिझवानची विकेट घेतली अन् टीम इंडियाने सामन्यात कमबॅक केलं. अखेरच्या 4 ओव्हरमध्ये पाकिस्तान 35 धावांची गरज होती. मात्र, बुमराहच्या अखेरच्या दोन ओव्हरने सामन्याचं पारडं फिरलं आणि भारताने ६ रन्सने सामना खिशात घातला.