मोहाली : भारताचा हिटमॅन रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या मोहालीतील दुसऱ्या वनडेत इतिहास रचला. रोहितने नाबाद २०८ धावांची खेळी करत क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला. तिसरे द्विशतक ठोकणारा रोहित पहिला फलंदाज ठरलाय.
रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुहेरी शतकाची हॅटट्रिक आहे. श्रीलंकेविरुद्धचे त्याचे हे दुसरे शतक आहे. रोहितने १५३ धावांत नाबाद २०८ धावा चोपल्या.
रोहितचा वनडेतील सर्वाधिक स्कोर २६४ आहे. श्रीलंकेविरुद्ध २०१४मध्ये त्याने ही धावसंख्या उभारली होती. याशिवाय २०१३मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकातामध्ये २०९ धावा ठोकल्या होत्या. मोहालीतील सामना संपल्यानंतर टीम इंडियाने केक कापताना रोहितचे यश साजरे केले. हा व्हिडीओ खाली देण्यात आलेला आहे.
How can we let our double centurion @ImRo45 go without cutting a but @ajinkyarahane88 and @yuzi_chahal were not going to stop at that. #TeamIndia #INDvSL pic.twitter.com/QP27ZWexsD
— BCCI (@BCCI) December 13, 2017
या वर्षात रोहितने सहाव्यांदा १००हून अधिक धावा केल्यात. विराट कोहलीने या वर्षी सहा शतके ठोकलीत. तर दुसरीकडे सचिन तेंडुलकरने १९९६मध्ये एका वर्षात सहा शतके ठोकली होती.