कोलंबो : तीन टेस्ट, पाच वनडे आणि एक टी-20ची सीरिज खेळण्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेला रवाना झाली आहे. तब्बल आठ वर्षानंतर भारत आणि श्रीलंका एका सिरीजमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार आहेत.
रवी शास्त्री टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतरची टीम इंडियाची ही पहिलीच सीरिज आहे. कोहली आणि कुंबळेमध्ये झालेल्या वादानंतर टीम इंडियाची मोठी नाच्चकी झाली होती. आता कोहली आणि शास्त्रीची जोडी श्रीलंका दौऱ्यामध्ये चांगली कामगिरी करून या सगळ्या वादावर पडदा टाकण्यासाठी मैदानात उतरेल.
२६ जुलैला भारत श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी खेळणार आहे. त्यानंतर कोलंबो आणि कँडीच्या मैदानावर दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. डम्बुला येथे पहिली वनडे २० ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर कँडी आणि कोलंबोमध्ये प्रत्येकी दोन वनडे खेळवल्या जातील.
तर ६ सप्टेंबरला भारत-श्रीलंका यांच्यात एकमेव टी-२० खेळवली जाणार आहे. याआधी २००९मध्ये भारत आणि श्रीलंकाच्या यांच्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये सीरिज खेळवण्यात आली होती. यात भारताने कसोटी मालिका २-०ने, वनडे ३-१ने जिंकली होती तर टी-२०मध्ये १-१ अशी बरोबरी झाली होती.
२६ जुलै - पहिली कसोटी गॉल
३ ऑगस्ट - दुसरी कसोटी कोलंबो
१२ ऑगस्ट - तिसरी कसोटी कँडी
२० ऑगस्ट - पहिली वनडे डम्बुला
२४ ऑगस्ट - दुसरी वनडे कँडी
२७ ऑगस्ट - तिसरी वनड कँडी
३१ ऑगस्ट - चौथी वनडे कोलंबो
३ सप्टेंबर - पाचवी वनडे कोलंबो
६ सप्टेंबर - एकमेव टी-२० कोलंबो
विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा