मुंबई : T20 वर्ल्डकप 2021 आता शेवटच्या फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीसाठीचे संघ जवळपास निश्चित झाले आहेत. पण सर्वांच्या नजरा ग्रुप 2 मधील उरलेल्या सामन्याकडे लागल्या आहेत. रविवारी अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला हरवलं तर भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग खुला होऊ शकतो.
दरम्यान या गोष्टी नेट-रनरेट (NRR) वर अवलंबून असतात. पण हा नेट-रन रेट कसा चालतो आणि त्यामुळे जिंकणं किंवा हरण्यात काय फरक पडेल, ते आज समजून घेऊया!
क्रिकेटमध्ये, जेव्हा जेव्हा एखादी मोठी ICC स्पर्धा असते किंवा जिथे जास्त संघ एकत्र खेळत असतात (IPL, Big Bash, Asia Cup), तेव्हा नेट-रन रेटची मोठी भूमिका असते. सध्या टी-20 वर्ल्डकपमध्ये याची खूप मोठी चर्चा होतेय.
कोणत्याही संघाचा नेट-रन रेट कोणत्याही सामन्यात खेळल्या गेलेल्या दोन्ही डावांवर अवलंबून असतो. म्हणजेच फलंदाजी करताना डावात किती ओव्हर्स खेळल्या गेल्या, किती रन्स झाले, गोलंदाजी करताना किती ओव्हर्स किती धावा झाल्या, या आधारावर नेट-रन रेट काढला जातो. त्यानंतर दुसऱ्या डावाची सरासरी पहिल्या डावातून वजा केली जाते आणि नेट-रनरेट काढण्यात येतो.
एकूण केलेले रन / एकूण खेळलेल्या ओव्हर्स - एकूण गमावलेले रन्स / एकूण टाकेलेल्या ओव्हर्स = नेट रन रेट
उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या टीमने फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 120 धावा केल्या तेव्हा रनरेट 6 होतं. पण गोलंदाजी करताना 15 ओव्हर्समध्ये सर्व धावा गमावल्या, तेव्हा रनरेट 8 होतं. या प्रकरणात, निव्वळ रनरेट - 2.000 होईल. 20 ओव्हर्समध्ये 120 धावा केल्यानंतर, एखाद्या संघाने 20 ओव्हर्समध्ये केवळ 100 धावा दिल्या, तर त्याचा नेट-रनरेट + 1.000 असेल.
जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने पूर्ण ओव्हर्स खेळल्या, परंतु दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारी टीम कमी धावसंख्येवर सर्वबाद झाली, तर त्याला नेट-रन रेटमध्ये पूर्ण ओव्हर्स खेळण्याचा फायदा मिळू शकतो. तसंच, संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक सामन्यासह नेट-रनरेट वाढत आणि कमी होत राहतं. जर एखाद्या टीमने पहिल्या सामन्यात चांगला खेळ केला आणि दुसऱ्या सामन्यात चांगला खेळ झाला नाही, तर त्याच्या स्पर्धेतील निव्वळ नेट-रनरेट फरक पडेल.