Paris Olympic: ऑलिम्पिकमधील अनेक खेळाडू आपल्या कामगिरीमुळे चर्चेत आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती तुर्कीच्या शूटरची. शूटिंग स्पर्धेत नेमबाज अधिक अचूकतेसाठी विशेष चष्म्यासह बरेच गियर घालतात. पण तुर्कीच्या युसूफ डिकेकने (Yusuf Dikec) आपला नेहमीचा साधा चष्मा घातलेला होता. खिशात हात घातलेल्या स्थितीत अजिबात दडपण नसल्याप्रमाणे त्याने निशाणा साधला आणि रौप्यपदक जिंकलं. नेटकऱ्यांना तर यावर विश्वासच बसत नव्हता. यामुळे सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली होती. दरम्यान आपला फोटो व्हायरल झाल्यानंतर युसूफ डिकेकने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शूटिंग स्पर्धेत नेमबाज अधिक अचूकतेसाठी विशेष चष्म्यासह बरेच गियर घालतात. तसंच आजुबाजूचा गोंधळ आपल्याला दुर्लक्षित करु नये याचीही काळजी घेतात. पण तुर्कीचा एअर पिस्तूल नेमबाज युसूफ डिकेकने (Yusuf Dikec) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून आपली प्रतिभा दाखवून दिली. सोशल मीडियावर शूटिंगचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. डिकेकने त्याचा साथीदार सेव्हल इलायदा तरहानसह (Sevval Ilayda Tarhan) 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. डिकेकने स्पर्धेसाठी मर्यादित गियर आणले होते. मात्र तरीही त्याला रौप्यपदक जिंकण्यापासून कोणी रोखू शकलं नाही.
Currently the most famous man in the world
— Enez Özen (@Enezator) July 31, 2024
“ऑलिम्पिक खेळ तुफान गाजवणारा तुर्की नेमबाज युसूफ डिकेकने इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर आपलं मौन सोडलं आहे. 51 वर्षीय खेळाडूने रौप्य पदक जिंकलं. परंतु स्पर्धेसाठी डिकेकच्या अपारंपरिक दृष्टिकोनामुळे त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. डिकेकने त्याच्या पाचव्या ऑलिम्पिकमध्ये विशिष्ट गियर न वापरण्याचे खरं कारण उघड केलं आहे, ” असं डेली मेलने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे. "'मला त्या उपकरणाची कधीच गरज नव्हती. मी एक नैसर्गिक नेमबाज आहे,” असं त्याने सांगितल्याचा उल्लेखही त्याने केला आहे.
युसूफ डिकेकने आपला नियमित चष्मा आणि इअरप्लग घातले होते. मात्र तरीही तो अत्यंत सहजपणे बहुतेक स्पर्धा जिंकला. निशाणा साधताना त्याचा एक हातात खिशात होता. त्याच स्थितीत त्याने पिस्तूल उचललं आणि निशाणा साधला. यानंतर त्याने साथीदारासह रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी केली.
तुर्कीचा हा 51 वर्षीय नेमबाज त्याच्या पाचव्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. 2008 बीजिंगमध्ये तो पहिल्यांदा खेळला होता. आपल्या या कारकिर्दीत अखेर तो पहिलं पदक जिंकण्यात यशस्वी झाला आहे आणि तेदेखील अत्यंत स्टाईलमध्ये जिंकला आहे.