कोलकाता : आयपीएल २०१८ च्या लिलावात अशा क्रिकेटर्सला खरेदी करण्यात आलं ज्यांनी कठीण परिस्थितीचा सामना करत क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावलं. यापैकीच एक क्रिकेटर म्हणजे रिंकू सिंह.
अलीगढ येथे राहणारा क्रिकेटर रिंकू सिंह हा आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे प्रसिद्ध आहे. तसेच रिंकूला ज्युनिअर रैना नावानेही ओळखलं जातं. रिंकू सिंह सुद्धा यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. रिंकूला शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने खरेदी केलं आहे.
टीम इंडियाच्या सुरेश रैनाला रिंकू आपला आदर्श मानतो. आयपीएलपूर्वी रैनानेच रिंकूला सल्ले दिले आहेत आणि आता त्या सल्ल्यांचा खूप उपयोग होणार असल्याचं रिंकूने म्हटलं आहे.
अलिगढ येथे राहणारऱ्या रिंकूची परिस्थिती खूपच हालाकीची आहे. रिंकूला केकेआरने ८० लाख रुपयांत खरेदी केलं आहे. ही किंमत म्हणजे त्याच्या बेसप्राईज पेक्षा चार पटींनी अधिक आहे. कोलकाताच्या टीमने खरेदी केल्यानंतर रिंकूचं रैनाने अभिनंदन केलं आहे.
रिंकूचे वडील एका एलपीजी कंपनीत डिलिव्हरीचं काम करतात. याच एलपीजी कंपनीच्या गोडाऊनच्या दोन खोल्यांत रिंकूचं परिवार राहतं.
रिंकूने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "मला कधीच वाटलं नाही की ८० लाख रुपयांत मला खरेदी केलं जाईल. मला वाटलं होतं की फार फार तर ३० ते ३५ लाख रुपये मिळतील."
Why wait for Monday to look for motivation? Draw some inspiration from our #Knight, Rinku Singh's story.
Find out more about his journey in this #KorboLorboJeetbo pic.twitter.com/YY6FzfbuNn
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 17, 2018
"आयपीएलमधून खूप काही शिकायचं आहे. मी अनेक शॉट्स शिकलो आहे आणि नेहमीच रैना दादाला फॉलो केलं आहे. सुरेश रैना माझा आदर्श आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी रैना दादाला भेटण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं." असंही रिंकूने म्हटलयं.
आयपीएलमध्ये पदार्पण करताच रिंकूच्या आयुष्यात अनेक बदल झाले. आता त्याचं कुटुंब एलपीजी गोडाऊनमधून एका दुसऱ्या घरात राहण्यास जाणार आहे. त्याचं नवं घरं दोन महिन्यांत तयार होणार असल्याचंही रिंकूने म्हटलं आहे.
रिंकूने सांगितले की, "माझं कुटुंब खूप मोठं आहे. माझ्याकडे क्रिकेटमध्ये जास्त फोकस करण्याव्यतिरिक्त इतर कुठलाचं पर्याय नाहीये. आयुष्यात खूपच स्ट्रगल केलयं त्याचचं फळ परमेश्वर आता देत आहे."
रिंकूने गेल्यावर्षी आयपीएल सीजन १०मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांत खरेदी केलं होतं. आता रिंकूची बेस प्राईज वाढवून २० लाख रुपये ठेवण्यात आली होती. यापूर्वी २०१२ मध्ये त्याची निवड अंडर-१६ च्या टीममध्ये करण्यात आली होती. यानंतर अंडर-१९ च्या टीमकडून खेळण्याचीही संधी रिंकूला मिळाली.