ड्रेसिंगरूममधला विराट कोहलीचा 'तो' व्हिडियो व्हायरल

पंतने जसा त्याचा खेळ दाखवण्यास सुरुवात केली तसा विराट कोहलीही आनंद घेऊ लागला.

Updated: Jan 22, 2022, 03:16 PM IST
ड्रेसिंगरूममधला विराट कोहलीचा 'तो' व्हिडियो व्हायरल title=

पार्ल : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा दारूण पराभव केला. सामन्यादरम्यान  खेळाडू आणि चाहतेही काही प्रमाणात तणावात होते. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या एका मजेदार व्हिडिओ समोर आलाय. 

पंत ज्यावेळी फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाने 2 विकेट्स गमावल्या होत्या. यामुळे टीम इंडियाच्या डग आऊटमुळे तणावाचं वातावरण होतं. मात्र विराटच्या या कृत्याने तणावाचं हे वातावरण काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसलं. पंतने जसा त्याचा खेळ दाखवण्यास सुरुवात केली तसा विराट कोहलीही आनंद घेऊ लागला.

कोहलीचा व्हिडीयो व्हायरल

विराट कोहली आणि शिखर धवन ड्रेसिंग रूममधून ऋषभ पंतची फलंदाजी पाहत होते. त्यावेळी जेव्हा पंतने मिड-फिल्डरवर शानदार चौकार मारला तेव्हा किंग कोहली आनंदाने डान्स करू लागला. त्याच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

पंतची उत्तम खेळी

ऋषभ पंतने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 119.71 च्या स्ट्राईक रेटने 71 बॉलमध्ये 85 धावांची उत्तम खेळी केली. पतंने 10 चौकार आणि 2 सिक्स मारत चांगला खेळ केला.

ऋषभ पंतच्या या खेळीमुळे टीम इंडियाने 50 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावत 287 रन्स केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 48.1 ओव्हरमध्ये केवळ 3 विकेट्स गमावत 288 रन्स केले आणि भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.