WC Semi Final Scenario: बांगलादेशाला हरवल्यानंतर टीम इंडियासाठी सेमीफायनलचं समीकरण बदललं; पाहा कसं आहे गणित?

World Cup 2023 Semi Final Scenario: टीम इंडियाने चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळाला आणि जिंकला देखील. या विजयाने टीम इंडियाचं सेमीफायनल गाठण्याचं गणित अजून सोप झालं आहे.

सुरभि जगदीश | Updated: Oct 20, 2023, 12:04 PM IST
WC Semi Final Scenario: बांगलादेशाला हरवल्यानंतर टीम इंडियासाठी सेमीफायनलचं समीकरण बदललं; पाहा कसं आहे गणित? title=

World Cup 2023 Semi Final Scenario: वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या विजयाची घौडदौड सुरुच आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने खेळले असून चारही सामन्यांमध्ये विजय मिळवणं शक्य झालंय. 4 सामन्यांमध्ये विजय मिळवल्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र आता 4 विजयानंतर टीम इंडियासाठी सेमीफायनलचं गणित कसं असणार आहे, ते जाणून घेऊया. 

वनडे वर्ल्डकपमध्ये 2023 श्रीलंका वगळता सर्व टीम्सने विजयाचं खातं उघडलंय. यामध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडचा तर नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंडचा प्रवास खूपच छान झाला आहे. यावेळी न्यूझीलंडच्या टीमने पहिले चार सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलंय.

4 सामने जिंकून टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर

टीम इंडियाने चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळाला आणि जिंकला देखील. या विजयाने टीम इंडियाचं सेमीफायनल गाठण्याचं गणित अजून सोप झालं आहे. बांगलादेशला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने पुढील अजून 2 सामने जिंकले, तर 6 विजयांसह 12 पॉईंट्सने सेमीफायनलसाठी पात्र होऊ शकते. 

सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित करण्यासाठी टीम इंडियाला पुढील आणखी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. 

...तर टीम इंडिया करणार सेमीफायनलमध्ये एन्ट्री

बांगलादेशचा पराभव केल्यानंतर पुढील 3 सामने जिंकल्यावर टीम इंडियाचे 7 सामन्यात एकूण 14 गुण होतील. सध्या भारतीय संघ 4 सामने जिंकून 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्याला उर्वरित 5 पैकी किमान 2 ते 3 सामने जिंकावे लागणार आहेत. 

टीम इंडियाला वर्ल्डकपमध्ये आगामी सामने येथे न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहेत. यामध्ये टीम इंडियाला न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांना 
टफ फाईट द्यावी लागणार आहे. 

टीम इंडियाचे आगामी सामने

22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू