CSK vs GT, IPL 2023 Final : आयपीएल 2023 च्या फायनल सामन्यात पावसाने अडथडा निर्माण केला आहे. त्यामुळे आता अंतिम सामना हा रिझर्व्ह दिवशी (Reserve Day) खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. त्यामुळे आता सोमवारी राखीव दिवशी 29 मे ला पुन्हा हा फायनलचा सामना खेळवण्यात येईल. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयपीएल फायनलचा (IPL 2023 Final) सामना कोण जिंकणार? गुजरात टायटन्स की चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs GT) हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आता महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विट करत मोठं वक्तव्य केलंय.
मला विचारण्यात आलं की, आज कोणता संघ आयपीएलची फायनल जिंकेल?, मला शुभमनच्या प्रतिभेवर विश्वास आहे आणि त्याने आज रात्री जिंकावं अशी माझी इच्छा आहे. पण मी धोनीचा खूप मोठा चाहता आहे आणि आशा करतो की तो आज रात्री चांगल्या संघाला जिंकू देईल...!, असं ट्विट आनंद महिंद्रा (Anand Mahindra On IPL Final) यांनी केलं आहे.
I was asked which team I’m supporting in tonight’s #IPL2023Final Well, I’m a believer in Shubhman’s talents & would like to see them flower tonight BUT I’m a bigger fan of #MSDhoni & can’t help but hope for him to blaze a trail of glory tonight. So let the best team win…!
— anand mahindra (@anandmahindra) May 28, 2023
यंदाच्या आयपीएलच्या सर्वात दोन तगड्य़ा टीम फायनलमध्ये भिडणार आहेत. दोन्ही संघाची बॅटिंग ऑर्डर मजबूत असल्याने आजच्या मैदानावर मोठ्या स्कोरची अपेक्षा आहे. मात्र, पावसामुळे अहमदाबादची पाटा खेळपट्टी फिरकीपटूंसाठी कशी ठरेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यंदा पुन्हा आयपीएल जिंकून धोनीला निरोप देणार का? असा सवाल आता चेन्नईचे फॅन्स विचारत आहेत. तर दुसऱ्यांदा आयपीएल कप जिंकून गुजरात टायटन्स (Gujarat Titans) बॅक टू बॅक आयपीएल चॅम्पियन ठरणार का? असाही प्रश्न विचारला जातोय.
आणखी वाचा - 'मला कपिल देवसारखं व्हायचं होतं, पण...' हरभजन सिंह याने केला मोठा खुलासा!
दरम्यान, राखीव दिवशी (IPL 2023 Final Reserve Day) देखील पावसाची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता फायनलवर पुन्हा पावसाचं सावट आहे. लीग स्टेजमधील सामन्यामध्ये 20 अंकासह गुजरात अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे आज पाऊस झाला अन् सामना रद्द करावा लागला तर गुजरात टायटन्स सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनणार आहे.