Sourav Ganguly vs Virat Kohli: विराट कोहली (Virat Kohli) याच्या दमदार कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) शनिवारी दिल्ली संघाविरुद्ध एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. सलग 5 सामने खेळल्यानंतर दिल्लीला आतापर्यंत एकही विजय नोंदवता आलेला नाही. चिन्नास्वामीच्या मैदानावर दिल्लीचा (DC) 23 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला आहे. सामना संपला पण चर्चा रंगली ती विराट कोहली (Virat Kohli) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या वादाची. सामन्यानंतर नेमकं काय झालं? याचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Bengaluru vs Delhi) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग कोहलीने दमदार अर्धशतक ठोकलं. विराटने सुरूवातीपासून आक्रमक खेळीचं प्रदर्शन करत दिल्लीच्या बॉलर्सवर आग ओकली. फिफ्टी झळकावल्यानंतर विराटने छाती ठोकत दिल्लीसमोर गर्जना केली. कधी नव्हे तो विराटचा हा आक्रमकपणा दिसून आला. विराटने गांगुलीसमोर केलेला रुद्रावतार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. विषय इथंच थांबला नाही.
Ganguly you up against a guy that you can never beat pic.twitter.com/Bop0WSJkBo
— Shadow (@7teenMagic) April 15, 2023
फिल्डिंग करताना विराट लाँग ऑनवर उभा होता. त्यावेळी विराटने एक कॅच पकडला. त्यावेळी देखील विराटने डगआऊटमध्ये बसलेल्या गांगुलीला खुन्नस देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गांगुलीने विराटकडे पाहिलं नाही. सामना पाहत असताना विराटची ही पद्धत क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आली. सामना जिंकल्यानंतर देखील विराट आणि गांगुलीच्या वादाची नवी झालर दिसून आली.
सामना बंगळुरूने दिमाखात जिंकला. त्यानंतर दोन्ही संघ हॅडशेक करण्यासाठी आले. त्यावेळी विराट कॅप्टन फाफ डुप्लेसिसनंतर रांगेत दुसऱ्या स्थानी होता. हॅडशेक करताना विराटसमोर येताच गांगुलीने विराटशी हस्तांदोलन करणं टाळलं. विराटचं लक्ष नसताना गांगुली पुढे निघून गेल्याचं दिसतंय. त्यामुळे गांगुली आणि विराट यांच्यात खरंच वाद आहे, असा निश्कर्ष सोशल मीडियावर काढला जात आहे.
Awkward moment between Sourav Ganguly and Virat Kohli!pic.twitter.com/zeKJUPjdHf
— OneCricket (@OneCricketApp) April 15, 2023
विराट कोहली फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा, 2021 मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी विराट कोहलीने RCB आणि भारताच्या टी-ट्वेंटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आलं होतं. विराटवर बीसीसीआयकडून प्रेशर येत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराटने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडलं आणि इथूनच सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वाद चव्हाट्यावर येऊ लागला होता.