हिवाळी ऑलिम्पीक २०१८:उत्तर कोरियाचे २२ खेळाडू जाणार दक्षिण कोरियाला

ही स्पर्धा दक्षिण कोरियातील प्योंगयांग येथे ९ ते २७ फेब्रुवारी या काळात पार पडणार आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 21, 2018, 09:19 PM IST
हिवाळी ऑलिम्पीक २०१८:उत्तर कोरियाचे २२ खेळाडू जाणार दक्षिण कोरियाला title=

सोल: पुढच्या महिन्यात दक्षिण कोरियात पार पडणाऱ्या हिवाळी ऑलिम्पीकमध्ये उत्तर कोरियादेखील सहभागी होणार आहे. तसेच, या ऑलिम्पीकसाठी उत्तर कोरियाचे तब्बल २२ खेळाडू आपला सहभाग नोंदवणार आहेत. ही स्पर्धा दक्षिण कोरियातील प्योंगयांग येथे ९ ते २७ फेब्रुवारी या काळात पार पडणार आहे. 

दरम्यान, हा निर्णय घेण्यापूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात पहिल्यांदाच एक उच्चस्तरिय बैठक पार पडली होती. ही बैठक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पीक समिती (आयओसी)ने स्वित्झर्लंड येथे आयोजित केली होती. या बैठकीत दक्षिण कोरियात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यात आली.

आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी म्हटले आहे की, दोन्ही देश फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या घद्घाटन समारंभात एकत्र संचलन करतील. दोन्ही देशात सुरू झालेला हा समझोता एक मैलाचा दगड ठरेल असेही थॉमस यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना थॉमस बाक यांनी म्हटले आहे की, उत्तर आणि दक्षिण कोरिया खेळाच्या मैदानात महिला संघाला एकत्रच उतरवेन. संयुक्त कोरियाच्या झेंड्याखाली खेळण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असल्याचेही थॉमस यांनी म्हटले आहे.