अरविंद केजरीवाल

आता केजरीवालांच्या विरोधात आंदोलन..

अरविंद केजरीवालांनी निवडणुकीपूर्वी कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आश्वासन दिलं होत. केजरीवालांनी कंत्राटी कामगारानां दिलेल आश्वासन पूर्ण न केल्यामुळे, कंत्राटी कामगारांनी केजरीवालांच्या विरोधात आंदोलनाचं शस्त्र उगारलं आहे. त्यामुळे दिल्लीतील सरकारी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.

Jan 30, 2014, 06:09 PM IST

अरविंद केजरीवाल `एक खोटारडा रेडिओ`

दिल्लीतील ओखला मतदारसंघाचे आमदार आसिफ मोहम्मद खान यांनी गुरूवारी केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. केजरीवाल हा एक खोटारडा रेडियो असल्याचंही आसिफ यांनी म्हटलंय.

Jan 30, 2014, 02:59 PM IST

केजरीवालांच्या अराजकतेवर राष्ट्रपती बरसले!

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या आंदोलनावर प्रहार करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुनावलं. सरकार म्हणजे दात्यांचं दुकान नाही आणि `लोकप्रिय अराजकता` प्रशासनाची जागा कधीही होऊ शकत नाही, असं राष्ट्रपती म्हणाले.

Jan 26, 2014, 07:57 AM IST

मोदींकडून किती पैसे घेतले- सोमनाथ भारतींचा मीडियावर आरोप

आधीच छापा प्रकरणावरून वादग्रस्त राहीलेले दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती आज पुन्हा नव्या वादात सापडले. मीडियावर मोदींकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. अखेरीस थोड्यावेळानं त्यांना समस्त पत्रकारांची माफी मागावी लागली.

Jan 25, 2014, 02:05 PM IST

`अराजक`नंतर `आप`चा ऑनलाईन `गल्ला` घटला

दिल्लीतील अराजक आम आदमी पार्टीला चांगलंच भोवलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रस्त्यावर उतरून केलेलं धरणं आंदोलन आणि स्वतःच कायदा हाती घेण्याचा कायदामंत्री सोमनाथ भारती यांचा खटाटोप आपच्या अंगलट आलाय. गेल्या 17 जानेवारीपासून पक्षाच्या ऑनलाइन देणग्यांमध्ये कमालीची घट झालीय.

Jan 23, 2014, 05:17 PM IST

सुशीलकुमारांच्या `लगीनघाई`वर राहुल गांधी नाराज

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गृहमंत्र्यावर सध्या नाराज असल्याचे समजतंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणं आंदोलनात एवढ्या लवकर बोलणी करण्याची गरज नव्हती, असं राहुल गांधी यांना वाटतंय.

Jan 23, 2014, 04:19 PM IST

अरविंद केजरीवाल वेडा मुख्यमंत्री – सुशीलकुमार

दिल्लीतले आंदोलन संपले असले तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यातला संघर्ष अजूनही संपलेला नाही.

Jan 22, 2014, 06:33 PM IST

केजरीवाल...बिना हत्याराचा माओवादी - भाजप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्द भाजपनं जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यसभेत विरोधी पक्ष भाजपचे नेते अरुण जेटली यांनी तर `अरविंद केजरीवाल हे बिना हत्याराचे माओवादी` असल्याचं म्हटलंय.

Jan 22, 2014, 10:27 AM IST

'आप'चा ड्रामा संपला : दोन दिवसानंतर धरणे आंदोलन मागे

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. रेलभवनजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.

Jan 21, 2014, 04:07 PM IST

`वैतागलेल्या केजरीवालांना हवंय राजीनाम्यासाठी निमित्त`

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर चढवलेले अरविंद केजरीवाल सध्या वैतागलेत... राजीनामा देण्यासाठी ते केवळ निमित्त शोधत आहेत, असं म्हणत किरण बेदी यांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवलाय.

Jan 21, 2014, 01:28 PM IST

दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांचे आंदोलन सुरुच

दिल्लीत ४ पोलिसांचे निलंबन किंवा बदली तरी करावी म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांचे धरणे आंदोलन आज दुस-या दिवशीही सुरु आहे.

Jan 21, 2014, 12:02 PM IST

जेव्हा मुख्यमंत्री आंदोलन करतात... तेव्हा नागरिकांचे हाल होतात...

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन सुरू केलंय.

Jan 20, 2014, 12:14 PM IST

भटकळच्या सुटकेसाठी अरविंद केजरीवालांच्या अपहरणाचा कट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धोका असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. केजरीवाल यांचं अपहरण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. पोलिसांच्या अटकेत असलेला दहशतवादी यासिन भटकळच्या सुटकेसाठी हा अपहरणाचा कट रचला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.

Jan 20, 2014, 08:21 AM IST

आप सरकारचा एफडीआयला विरोध, मल्टिब्रँड रिटेलचा एफडीआय रद्द

दिल्लीमध्ये काँग्रेस सरकारनं मल्टिब्रॅन्ड रिटेल म्हणजेच किराणा व्यापार क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला वाव देण्यासाठी घेतलेले निर्णय दिल्लीत सत्ता स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांतच रद्द केले.

Jan 14, 2014, 10:38 AM IST

केजरीवाल यांचा ‘जनता दरबार’ बरखास्त

नागरिकांमध्ये रिअल ‘नायक’ म्हणून स्वतःला सिद्ध करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जनता दरबार बंद केला आहे. शनिवारी जनता दरबार भरवून प्रत्यक्ष लोकांच्या तक्रारी जाणून घेण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतला होता. पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने जनता दरबार स्थगित करावा लागला होता.

Jan 13, 2014, 06:03 PM IST