काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरूच
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही काँग्रेसचा घोळ कायम आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता पुन्हा पुढे ढकललाय. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार होता.
Jun 1, 2014, 12:56 PM ISTकाँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रीपदांची नावं निश्चितीसाठी मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
Jun 1, 2014, 09:19 AM ISTविधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटणार?
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोर जावं लागलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधला संघर्ष अजून संपलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आघाडी बाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं सांगत आघाडी राहीलच अशी शक्यता नसल्याचे संकेत दिलेत.
May 25, 2014, 09:30 PM ISTनरेंद्र मोदींचा देशात प्रचंड विजय
एनडीएने भारतात ३२५ जागांची आघाडी घेतली आहे. देशात २७५ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
देशात `अब की बार मोदी सरकार` हे भाजपाचे प्रचार वाक्य सत्यात उतरणार आहे.
लोकसभा निकाल : पाहा, ४८ मतदारसंघांचा निकाल
राज्यातील 48 जागांपैकी 22 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर शिवसेना 19, राष्ट्रवादी 5 तर काँग्रेस अवघ्या 1 जागेवर आघाडीवर आहे.
May 16, 2014, 11:00 AM ISTमुंबई कुणाची? महायुती आघाडीला सुरूंग लावणार?
मुंबई कुणाची? याचा फैसला गुरूवारी होणाराय... मुंबईतील सहा मतदारसंघात उद्या गुरुवारी मतदान होतंय. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने या सहाच्या सहा जागा जिंकल्या होत्या. आघाडी यंदाही ती किमया कायम राखणार की, महायुती आघाडीला सुरूंग लावणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.
Apr 22, 2014, 10:44 PM ISTपक्के वैरी झाले सख्खे मित्र... आघाडीला फायदा?
एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समझोता झालाय.
Apr 11, 2014, 12:52 PM ISTपवारांपाठोपाठ मुंडेंचा गौप्यस्फोट; आघाडीला धक्का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना केली.
Feb 9, 2014, 11:21 PM ISTटीएमसीत परिवहन समिती निवडणुकीत आघाडीची बाजी
ठाणे महानगरपालिका परिवहन समिती निवडणुकीत आघाडीनं बाजी मारलीय. भाजपचे सदस्य अजय जोशी यांना आपल्या बाजूनं वळवण्यात आघाडीला यश आलंय. त्यांनी आघाडीला मत दिलंय.
Dec 23, 2013, 12:23 PM ISTठाणे पालिका स्थायी समिती निवडणुकीत चुरस, आघाडीत बिघाडी
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. महायुती आणि आघाडीकडे प्रत्येकी आठ सदस्य असल्यामुळे पुन्हा चिठ्ठी टाकून मतदान होणार होतं. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. तर युतीमध्येही फूट पडलीये.
Oct 8, 2013, 07:24 AM ISTशिवाजीराव मोघेंचा आघाडीला घरचा आहेर!
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तोडून स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी करत, आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. ते रामटेक लोकसभा क्षेत्राच्या केंद्रस्तरीय मतदार अभिकर्ता यांच्या मेळाव्यात बोलत होते.
Sep 10, 2013, 06:40 PM IST`काँग्रेसचा हात` उंचच उंच... आघाडीवर
कर्नाटकचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता लागलीये. येडियुरप्पांच्या बंडानंतर भाजपचं पहिलं वहिलं दक्षिणेकडचं राज्य हातातून जाण्याची शक्यता आहे.
May 8, 2013, 09:35 AM ISTयुतीने केली माती – शरद पवारांची टीका घणाघाती
मुंबईत गेल्या १६ वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे, परंतु त्यांच्यामुळे मुंबई बकाल झाली. मुंबईत पर्यटकांची संख्या कमी झाली असून मुंबईत आता परिवर्तनाची गरज असल्याचा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आघाडीच्या सभेत हाणला.
Feb 9, 2012, 10:33 PM ISTआघाडीची गाडी रूळावर....
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेली अनेक दिवस सुरू असणाऱ्या आघाडी गाडी आज कुठे रूळावर आली आहे. आज मुंबईतला आघाडीचा वॉर्डवाटपाचा तिढा सुटला आहे. त्यानुसार आता वॉर्ड क्रमांक ५० , ५६ काँग्रेसला मिळाला आहे.
Jan 21, 2012, 04:03 PM ISTवॉर्ड वाटपावरुन आता काँग्रेस-राष्ट्रवादीत नवा तिढा
आघाडीतला जागावाटपाचा तिढा सुटला असला, तरी वॉर्ड वाटपावरुन आता काँग्रेस-राष्ट्रवादीत नवा तिढा निर्माण झाला आहे. तोट्याचे वॉर्ड मिळाल्याने राष्ट्रवादी नाराज आहे.
Jan 12, 2012, 12:13 AM IST