आघाडी

दोन्ही काँग्रेस आघाडीबाबत आज चर्चा - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीकडे असलेल्या ११४ जागांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. तसंच आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत राष्ट्रावादी काँग्रेस सोबत बैठक घेऊन आघाडीबाबत महत्त्वाची भूमिका घेणार असल्याचंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. 

Sep 23, 2014, 08:24 AM IST

रणशिंंगानंतरही, महायुती-आघाडीच्या घरात आदळआपट

महायुतीतला जागावाटपाचा तिढा अजूनही सुटण्याची चिन्ह नाहीत. जागावाटपाचा जुनाच फॉर्म्युला कायम राहील अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. 

Sep 14, 2014, 04:42 PM IST

राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला, सस्पेन्स कायम

निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनंही प्राचाराचा नारळ फोडला. मुंबईतल्या वाय व्ही चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि सहयोगी सदस्यांसह पक्षाचे पदाधिकारी प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित होते. 

Sep 6, 2014, 10:37 PM IST

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आघाडीतलं 'दुखणं'

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील काही बाबी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. पीटीआयशी बोलतांना न डगमगता मुख्यमंत्र्यांनी काही मतं मांडली आहेत.

Aug 31, 2014, 11:26 AM IST

काँग्रेस आघाडीबाबत राष्ट्रवादीची सारवासारव

 स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडीबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतली. २८८ जागांच्या मुलाखती म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवणार असा अर्थ होत नाही, अशी सारवासारव राष्ट्रवादीनं केलीये. पुढल्या आठवड्यात दिल्लीत आघाडीबाबत अंतिम निर्णय होईल, असंही पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

Aug 28, 2014, 07:40 AM IST

आघाडी कायम, सोनिया-पवारांचा निर्णय

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कायम राहणार आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची नवी दिल्लीत बैठक पार पडलीय त्यात आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पवार आणि सोनियांमध्ये जागावाटपावरही चर्चा झालीय. 

Aug 6, 2014, 05:52 PM IST

काँग्रेसला आघाडी चालवण्याची अक्कल नाही - डी. पी. त्रिपाठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी यांनी काँग्रेसवर जहरी टीका केलीय. काँग्रेसला आघाडी चालवण्याची अक्कल नाही. 

Aug 1, 2014, 07:55 PM IST

काँग्रेस मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ, CM पुन्हा दिल्लीला

काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरुच आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावावंर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Jun 1, 2014, 07:54 PM IST