काँग्रेसला आघाडी चालवण्याची अक्कल नाही - डी. पी. त्रिपाठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी यांनी काँग्रेसवर जहरी टीका केलीय. काँग्रेसला आघाडी चालवण्याची अक्कल नाही. 

Updated: Aug 1, 2014, 07:55 PM IST
काँग्रेसला आघाडी चालवण्याची अक्कल नाही - डी. पी. त्रिपाठी title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी यांनी काँग्रेसवर जहरी टीका केलीय. काँग्रेसला आघाडी चालवण्याची अक्कल नाही. 

आपल्या पराभवातून काँग्रेसने काही शिकले पाहिजे, मित्रपक्षांशी भांडता कामा नये.  लोकसभेनंतर राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. जर काँग्रेस हे नाकारत असेल तर आघाडी तोडण्याचे काम काँग्रेस करतेय, आम्ही नाही... अशा शेलक्या शब्दांत त्रिपाठी यांनी काँग्रेसवर तोफ डागलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील संबंध ताणले गेलेत. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीनं हा आक्रमक पवित्रा घेतलाय.

लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास महाराष्ट्रात राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात. मात्र केवळ पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दाखवलेल्या मोठेपणामुळं आम्ही निम्म्याच जागांची मागणी केली आहे, याचं भान ठेवावं, असा टोलाही यावेळी त्रिपाठी यांनी लगावला. 

महाराष्ट्राचं नेतृत्व काय आहे, हे लोकसभा निवडणुकीच्यावेळी कळलं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाची खिल्ली उडवताना काँग्रेसनं राष्ट्रवादीला कमी लेखू नये, असा इशाराच त्रिपाठी यांनी दिला. 

काँग्रेस नेते नटवर सिंह यांच्या पुस्तकावरून उठलेल्या वादळाबाबत पत्रकारांनी विचारले असता नटवर यांनी सोनियांबद्दल जे लिहिलंय त्यात काहीही चूकीचं नसल्याचंही मत त्रिपाठी यांनी यावेळी विचारलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.