मुंबई: मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पंधरा दिवस झालेले नारायण राणे मंगळवारी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वी राणेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर काँग्रेसमधून त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न झाला. राहुल गांधींनी राणेंशी चर्चा केली. त्यानंतर राहुल गांधी सोनिया गांधींशी चर्चा करणार होते. मात्र पुढे काँग्रेसकडून राणेंना कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अस्वस्थ असलेले राणे मंगळवारी आपली अंतिम भूमिका जाहीर करणार आहेत.
आता राणे काँग्रेसमध्येच राहणार की काँग्रेस सोडणार, मंगळवारी राणे काय भूमिका जाहीर करणार याबाबत उत्सुकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.