आरक्षण

गुर्जर समाजाची आरक्षण मागणी सरकारने केली मान्य

राजस्थानात रेल रोको, रास्ता रोको करणा-या गुर्जर समाजाची आरक्षणाची मागणी सरकारनं मान्य केली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस सुरु असलेले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. या आंदोलनामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता.

May 29, 2015, 09:17 AM IST

रेल्वेचे आरक्षित तिकीट नाही, नो टेन्शन ! रेल्वेचे नवे अॅप

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. ज्यांच्याकडे आरक्षण श्रेणीतील तिकीट नसेल आणि तिकिट खिडकीवर रांगा, यामुळे रेल्वेचे तिकिट मिळत नाही. आता त्याची चिंता मिटणार आहे. रेल्वे अनारक्षित श्रेणीत तिकिट मिळण्यासाठी रेल्वे एक मोबाील अॅपचा वापर करणार आहे.

Apr 21, 2015, 07:49 PM IST

चहूबाजुंनी टीकेमुळे 'मुस्लिम मताधिकारावर' शिवसेना वरमली!

मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याच्या मागणीवरून नवा वाद पेटलाय. मुस्लिम आरक्षणाचा निर्णय रद्द करणाऱ्या सरकारविरोधात रान पेटवण्याची आयती संधी विरोधकांना मिळालीय. तर शिवसेनेनंच याबाबत आता मवाळ भूमिका घेतलीय.

Apr 13, 2015, 10:31 PM IST

मुस्लिम, आरक्षण आणि मताधिकाराचा वाद...

मुस्लिम, आरक्षण आणि मताधिकाराचा वाद... 

Apr 13, 2015, 08:22 PM IST

मुस्लिम आरक्षण रद्दचा जीआर जाळला

आघाडी सरकारच्या काळात मुस्लिमांना दिलेलं आरक्षण रद्द करण्याचा जीआर देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केला आहे. मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा जीआर फडणवीस सरकारने काढला आहे.

Mar 10, 2015, 02:39 PM IST

रेल्वे आरक्षित तिकिटावरील प्रवासी नाव बदलणे शक्य

रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज दिली आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटावरील प्रवाशाचे नाव बदलणे शक्य आहे. रेल्वेने ही सुविधा आता उपलब्ध करुन दिली आहे.

Jan 24, 2015, 08:47 AM IST

मराठा आरक्षणावरून हायकोर्टानं सरकारला खडसावले

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याच्या वटहुकूमास दिलेली अंतरिम स्थगिती लागू असताना पुन्हा याच आरक्षणाचा कायदा विधिमंडळात कसा काय केला, असा सवाल मुंबई हायकोर्टानं सोमवारी राज्य सरकारला केला.

Jan 6, 2015, 10:51 AM IST

आरक्षण: धनगर विरुद्ध आदिवासी संघर्ष उफाळणार?

धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र याला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी स्पष्टपणे विरोध केलाय. या मुद्यावरून आता आदिवासी नेते आणि मंत्री आक्रमक झालेत. त्यामुळं यावरून धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यताय.

Jan 5, 2015, 09:26 PM IST

'धनगर समाजाला दिलेल्या शब्दापासून मागे हटणार नाही'

महायुतीने धनगर समाजाला जो शब्द दिला आहे, त्या शब्दापासून महायुती मागे हटणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केलं आहे, या शिवाय आदिवासी समाजाच्या आरक्षणातला वाटा, आम्ही कोणालाही देणार नसल्याचंही  मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Jan 4, 2015, 05:59 PM IST