जयपूर : राजस्थानात रेल रोको, रास्ता रोको करणा-या गुर्जर समाजाची आरक्षणाची मागणी सरकारनं मान्य केली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस सुरु असलेले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. या आंदोलनामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता.
गुर्जरांना अनुसूचित जमातींमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार विधानसभेत प्रस्ताव आणणार आहे. गुर्जरांसह अन्य चार जमातींनाही या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती गुर्जर समाजाचे नेते किरोडी सिंह बैसला यांनी दिलीय.
राजस्थान सरकारचे मंत्री आणि गुर्जर समाजाचे नेते यांच्यात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत या मुद्यावर तोडगा काढण्यात आला. यानंतर गुर्जरांनी राज्यभर सुरु केलेलं चक्का जाम आंदोलन मागं घेतलंय. तसंच आरक्षणाची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना भेटून धन्यवाद दिलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.