उदय सामंत

जैतापूर ऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध, रत्नागिरीत मोर्चा

जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून १७ तारखेला रत्नागिरीत मोर्चा काढणार आहे. प्रकल्पाचं रत्नागिरीतील कार्यालय बंद पाडणार, असा इशारा आमदार उदय सामंता यांनी दिला आहे.

Mar 7, 2015, 06:20 PM IST

शिवसेनेत चलबिचल, रत्नागिरीचे आमदार उदय सामंतांची दांडी

 एकविरा देवीच्या दर्शनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे एक सोडून सर्व आमदार उपस्थित होते. मात्र यावेळी उदय सामंत अनुपस्थित होते. सामंत यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र आपण मतदारसंघातल्या दौ-यामुळे अनुपस्थित असल्याचं स्पष्टीकरण सामंत यांनी दिलं आहे.

Nov 5, 2014, 08:19 AM IST

अखेर, शिवसेनेची ४८ वर्षांची प्रतिक्षा संपली!

कोकण... शिवसेनेचा बालेकिल्ला... पण, या बालेकिल्ल्यात रत्नागिरी विधानसभेच्या जागेवरून सेनेचा पहिला आमदार निवडून जाण्यासाठी शिवसेनेच्या स्थापनेपासून (१९६६) आत्तापर्यंत प्रतीक्षा करावी लागलीय. 

Oct 21, 2014, 06:28 PM IST

शिवसेना रत्नागिरी मतदारसंघ करणार काबीज!

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. तर गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात भाजपाचे बाळ माने उभे ठाकले आहेत.

Oct 2, 2014, 12:52 PM IST

राज्यमंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला दे धक्का, सेनेकडून उमेदवार

रत्नागिरीचे आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उदय सामंत हे  उद्या शिवसेनेच्या तिकीटावर अर्ज दाखल करतील. 

Sep 26, 2014, 03:39 PM IST

'माझ्याविरुद्ध मतदारसंघात कारस्थान'

'माझ्याविरुद्ध मतदारसंघात कारस्थान'

Sep 24, 2014, 09:24 PM IST

मुंबईत मेट्रो उद्यापासून धावणार, अधिकृत घोषणा

मुंबईत मेट्रो ट्रेन उद्यापासून धावणार आहे. मुंबई मेट्रोचे सीईओ अभय मिश्रा यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केलीय.

Jun 7, 2014, 11:27 AM IST

राणेंना मदत न करण्यावर राष्ट्रवादी कार्यकर्ते ठाम

सिंधुदुर्गात नारायण राणेंना मदत करणार नसाल तर खड्यासारखे बाजूला करू असा इशारा उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला होता. तरीही कार्यकर्ते माघार घ्यायला तयार नाहीत. वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊ पण राणेंना मदत करणार नाही असा पवित्रा त्यांनी आता घेतलाय. सामंतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळलीय.

Mar 27, 2014, 08:59 AM IST

नारायण राणे दूर करणार सामंतांची नाराजी?

काँग्रेस नेते नारायण राणे हे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत.

Mar 8, 2014, 06:08 PM IST