उस्मानाबाद

उस्मानाबादमध्ये होणार 97वं नाट्यसंमेलन

उस्मानाबादमध्ये 97 वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन भरणार आहे.

Jan 21, 2017, 09:27 PM IST

शेतकऱ्यावर काय ही वेळ, कर्जासाठी किडनी विकण्याची हवेय परवानगी!

सततच्या दुष्काळामुळे तोट्यात असलेल्या शेतीचे कर्ज फेडण्यासाठी, एका शेतक-यानं चक्क आपली किडनी विकण्याची परवानगी जिल्हाधिका-याकडे मागितल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये समोर आली आहे. मात्र हे कर्ज हात उसने घेतल्याचं त्यांच्याच वडिलांनी म्हटल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे.

Jan 10, 2017, 11:26 PM IST

उस्मानाबाद बस अपघात ५ ठार तर १५ जण जखमी

एसटी आणि दुसरी एक बस यांच्यात झालेल्या अपघातात ५ जण ठार झालेत तर १५ जण जखमी झालेत. आज सकाळी हा अपघात  पुणे - हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गवर अपघात झाला.

Dec 23, 2016, 09:38 AM IST

उस्मानाबादेत 91 लाख 50 हजार ची रक्कम जप्त

जिल्ह्यातील उमरगा येथे निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाई करत ९१ लाख ५० हजार ची रक्कम जप्त केली आहे . उमरगा येथील चौरस्ता भागात वाहनाची तपासणी करीत असताना, संशय आल्याने पथकाने गाडीची तपासणी केली. त्यावेळी १ हजार  रूपयांच्या नोटा मधून ९० लाख रूपयांच्या तर ५०० रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात दीड लाख अशी रक्कम जप्त केली आहे. 

Nov 16, 2016, 06:24 PM IST

उस्मानाबादमध्ये पावसाचा कहर

पावसानं सर्वदूर धुमाकुळ घातलाय. उस्मानाबादमध्ये सारोळा, दारफळ, दाऊतपूर, राजुरी, सांगवी आणि कामेगाव परिसरात सर्वच नदी नादे दुथडीपार झालेत. 

Oct 2, 2016, 08:43 AM IST

उस्मानाबादकरांना वरुण राजा पावला

पाण्यासाठी तासंतास टँकरची वाट पहाणं. टँकर आला की हंडाभरपाण्यासाठी जीवावर उदार होणं. गेल्या चारवर्षांपासून उस्मानाबादमध्ये असंच चित्र दिसत होतं. मात्र चारच दिवसांत जिल्ह्यातलं हे चित्र पालटून गेलं.

Sep 26, 2016, 10:06 AM IST

इंदापूर गावात दोन घरांवर दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत 5 गंभीर

 इंदापूर गावात एकाच रात्रीत 2 घरावर दरोडा पडला असून दरोडेखोरांच्या मारहाणीत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Sep 9, 2016, 01:57 PM IST

२१ सावकारांच्या टोळक्याचा जाच; महिला शेतकऱ्याची आत्महत्या

खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. पण उस्मानाबादमध्ये २१ सावकारांच्या टोळीनं मिळून एका महिला शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं.

Aug 31, 2016, 07:59 PM IST

कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शहरात मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन केलं होते.

Aug 26, 2016, 03:12 PM IST