मुंडे पुन्हा रुसले, पण यावेळी रिक्षात बसले!
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात मुक्कामी असलेले भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना विमानतळाकडे घेऊन जाण्यासाठी नियोजित वेळी वाहन न आल्यानं मुंडे यांचा पारा चांगलाच चढला. संतापाच्या भरात ते हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या रिक्षात बसून थेट विमानतळाकडे रवाना झाले.
Apr 20, 2014, 04:13 PM ISTराणे, शिंदे, मुंडे, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे यांची कसोटी
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे आदी दिग्गजांची कसोटी लागणार आहे. तर कोकणात सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे लक्ष आहे. नीलेश राणेविरूद्ध विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत आहे.
Apr 17, 2014, 10:12 AM ISTमुंडेंनी पाठिंब्यासाठी चार फोन केले - राज ठाकरे
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना आपण त्यांच्या विनंतीवरून पाठिंबा दिला आहे. मुंडेंनी पाठिंब्यासाठी चार वेळेस फोन केले, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोगेश्वरीच्या जाहीर सभेत सांगितलं आहे.
Apr 15, 2014, 08:26 PM ISTबीडमध्ये अखेर गोपीनाथ मुंडेंच्या मदतीला मनसे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बीडचे भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Apr 15, 2014, 07:27 PM ISTमनसेचा विषय माझ्यासाठी बंद: उद्धव ठाकरे
माझ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विषय हा संपलेला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं मनसेवर टीका केली आहे.
Apr 13, 2014, 07:02 PM ISTराज-गडकरी मैत्री, पुण्यात मुंडे गटाला तडाखा
पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार देण्यामागे भाजपमधील एका गटाचाच सहभाग असून, त्याबद्दलची नाराजी तेथील कार्यकर्त्यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह; तसेच अन्य नेत्यांपर्यंत पोचवली आहे.
Apr 11, 2014, 04:46 PM ISTमुख्यमंत्री बनण्याची मुंडेंची सुप्त इच्छा उघड!
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचं, हे आम्ही नाही तर खुद्द मुंडेंनी पुण्यातल्या सभेत म्हटलंय.
Apr 11, 2014, 01:26 PM ISTमुंडे भाजपची 'गोमु' - आर आर पाटील
भाजपमधील लोकांना आपली नावं बदलण्याची सवयच आहे. नमो म्हणजे नरेंद्र मोदी तर गोमु म्हणजे गोपीनाथ मुंडे असल्याची टीका गृहमंत्री आर. आर. पाटलांनी केलीय.
Apr 9, 2014, 10:36 PM ISTमहायुतीत सहावा भिडू दाखल
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसंग्राम सेनेचे अध्यक्ष विनायक मेटे महायुतीत दाखल झाले आहेत.
Mar 28, 2014, 05:47 PM ISTफाटाफुटीला उधाण, अजित पवारांना गावितांचा झटका
निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसं सर्वच पक्षांमध्ये फाटाफुटीला उधाण आलंय. शिवसेनेचे खंदे नेते राहुल नार्वेकरांना राष्ट्रवादीनं फोडल्यानंतर काल महायुतीतल्या भाजपनं त्याचा बदला घेत राष्ट्रवादीचे भिवंडी शहर अध्यक्ष कपिल पाटील यांना भाजपमध्ये घेतलं. तर वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांची कन्या हिना, यांना भाजप तिकिट देण्याची शक्यता असताना विजयकुमार गावित यांनीही फुटीचे स्पष्ट संकेत दिलेत.
Mar 19, 2014, 09:43 AM ISTमातोश्रीवर मुंडे, तावडेंशी उद्धव ठाकरेंची बैठक
उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे यांची मातोश्रीवर चर्चा सुरू आहे.
Mar 18, 2014, 08:31 PM ISTराष्ट्रवादीच्या कपिल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश!
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामचा सिलसिला सुरूच आहे. राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देत भाजपनं भिवंडीचे शहरप्रमुख आणि ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष कपिल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय.
Mar 18, 2014, 04:10 PM ISTमहाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसच भाजपचे नेते - मुंडे
भाजपमधील सुंदोपसुंदी आता नेत्यांकडून व्यक्त होत असतांना दिसून येत आहे.
Mar 16, 2014, 07:34 PM ISTमुख्यमंत्री झालो तरच येणार - गोपीनाथ मुंडे
‘महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार असून, मीच मुख्यमंत्री होणार आहे,`` असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केलं. ते धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. याआधी मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता ते पद मिळालं तर घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणूनच येणार, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलंय.
Mar 16, 2014, 01:22 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर... गडकरी विरुद्ध मुंडे
भाजपच्या नेतृत्वाने धावाधाव करून उद्धव ठाकरेंची मनधरणी केल्यानं तूर्तास महायुतीवरील गंडांतर टळलंय. मात्र, यानिमित्तानं महाराष्ट्र भाजपमध्येच नितीन गडकरी विरूद्ध गोपीनाथ मुंडे गट असं घमासान सुरू झालंय.
Mar 13, 2014, 03:46 PM IST