'एमसीए'समोर मुंडे देणार मुंबईकर असल्याचे पुरावे!
एमसीए निवडणुकीसाठीची उमेदवारी रद्द झाल्यामुळं नाराज झालेले गोपीनाथ मुंडे आज एमसीएसमोर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहेत. मुंडेंना आज एमसीएनं वेळ दिल्याची माहिती मिळालीय.
Oct 16, 2013, 11:34 AM IST`एमसीए` निवडणुकीसाठी मुंडेंनी भरलेला अर्ज अवैध?
‘एमसीए’च्या निवडणुकीतून गोपीनाथ मुंडे बाद झालेत. मुंडेंनी अध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज बाद ठरवण्यात आलाय.
Oct 12, 2013, 11:38 PM ISTMCAच्या मैदानात मुंडे X पवार सामना रंगणार!
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार आणि भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्यात सामना रंगणार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय.
Oct 8, 2013, 11:23 PM ISTमुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक : मुंडे विरूध्द पवार?
भाजपचे नेते गोपिनाथ मुंडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा आज अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळीची एमसीए निवडणूक शरद पवार विरुद्ध गोपिनाथ मुंडे अशी होण्याची चिन्ह आहेत.
Oct 8, 2013, 02:21 PM ISTनरेंद्र मोदी आणि भरत शहा एकाच व्यासपीठावर!
मुंबईतल्या हिरे व्यापाऱ्यांच्या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण केलं खरं, मात्र या कार्यक्रमात वादग्रस्त हिरे व्यापारी भरत शहा यांची व्यासपीठावरची उपस्थिती चर्चेचा विषय ठरलीय.
Oct 1, 2013, 09:49 AM IST‘उस्मानी पळाला की पळवून लावला?’
दहशतवादी अफझल उस्मानी पोलिसांच्या हातून पळून गेला, ही बाब धक्कादायक आहे. ‘पण, तो पळाला की त्याला पळवून लावलं? हे सरकारचं एक षडयंत्र आहे की काय? असा आरोप भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.
Sep 21, 2013, 04:39 PM ISTमुंडे, मुख्यमंत्र्यांचं `क्रिकेट`, की पवारांना `चेकमेट`?
पृथ्वीराज चव्हाण ज्या माझगाव क्रिकेट क्लबकडून मैदानात उतरले त्याच क्लबचे सेक्रेटरी शाहआलम हे स्टायलो क्रिकेट क्लबचेही मालक आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि गोपीनाथ मुंडे यांना क्रिकेटच्या मैदानात उतरवणारा समान दुवा एकच आहे.
Sep 17, 2013, 05:49 PM ISTएमसीएच्या आखाड्यात आता मुंडे, सरदेसाई सुद्धा!
शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ आता भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही एमसीए निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केलीय. तर तिकडे मनसेचे नितीन सरदेसाईसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.
Sep 17, 2013, 11:56 AM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : तर तपास सीबीआयकडे - मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी अन्य तपास यंत्रणांची मदत घेतली जाते. या प्रकरणात गरज पडली तर सीबीआयकडेही हे प्रकरण सोपवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. या प्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Sep 7, 2013, 09:00 AM ISTदाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडं द्या - मुंडे
पुण्यात सर्वात जास्त गुन्हेगारी आहे. चांगल्या IPS अधिका-यांना पुण्यात पोस्टिंग दिलं जात नाही, असा आरोप भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडं द्यावा. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची उकल होणं अशक्य आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.
Sep 3, 2013, 08:56 AM ISTकाका गोपीनाथ मुंडेंच्या नाकावर टिच्चून धनंजय मुंडेंचा विजय
काकांच्या छत्राखालून बाहेर पडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पुन्हा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनीच बाजी मारलीय पण, राष्ट्रवादीच्या तिकिटावर...
Sep 2, 2013, 06:17 PM ISTमुंडे विरुद्ध मुंडे; कोण मारणार बाजी?
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी आज निवडणूक होतेय. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि भाजप-शिवसेना पुरस्कृत पृथ्वीराज काकडे यांच्यात लढत होतेय.
Sep 2, 2013, 10:33 AM ISTपोलिसांच्या घरांसाठी मुंडेचा मुंबईत मोर्चा
मुंबईतमधील बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या पोलिसांना हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी भाजपच्यावतीने वरळीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले.
Jul 29, 2013, 06:50 PM ISTराज्यात अलिबाबा आणि ४० चोरांचे राज्य – मुंडे
राज्यात अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांचे राज्य आहे, यांना घरी घालवल्या शिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी सांगलीच्या सभेत व्यक्त केला.
Jul 5, 2013, 05:14 PM ISTमुंडे अडचणीत, आयकर खात्याची नोटीस
गेल्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याचे प्रकरण भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांना आता आणखी अडचणीत टाकण्याची शक्यता आहे. मुंडे यांना निवडणूक आयोगापाठोपाठ आयकर विभागानेही नोटीस पाठवली आहे.
Jul 3, 2013, 09:24 PM IST