www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ आता भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही एमसीए निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केलीय. तर तिकडे मनसेचे नितीन सरदेसाईसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.
एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणी क्रिकेटच्या पीचवर उतरलेत. शरद पवारांनी याआधीच एमसीए निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य होत एमसीएमध्ये एंट्री घेतली. त्यामुळं एमसीए निवडणुकीत पवार विरुद्ध मुख्यमंत्री असा सामना रंगणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मात्र याबाबत मौन बाळगलंय.
त्यातच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही एमसीए निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केलीय. मुंडेंनी स्टायलो क्लबचं प्रतिनिधीत्व स्वीकारलं असून क्लबकडून मुंडे निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळतेय. तर तिकडे मनसेचे नितीन सरदेसाईसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. पारशी झोराष्ट्रीयन क्लबकडून ते निवडणूक लढवणार आहेत. एकूणच राजकारण्यांच्या सहभागामुळं एमसीएचे रवी सावंत मात्र नाराज झालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.