www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दहशतवादी अफझल उस्मानी पोलिसांच्या हातून पळून गेला, ही बाब धक्कादायक आहे. ‘पण, तो पळाला की त्याला पळवून लावलं? हे सरकारचं एक षडयंत्र आहे की काय? असा आरोप भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.
राज्यातल्या विविध तुरूंगातून ५१४ आरोपी पळून गेलेत, ही लाजीरवाणी बाब आहे अशी टीका मुंडे यांनी केलीय. पोलिसांनी त्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केलीय.
शुक्रवारी दुपारच्या जेवणानंतर शतपावली करण्यासाठी अफजलला न्यायालयाच्या आवारात सुरक्षेसह फिरवलं जात होतं. मात्र, संधी साधत अफजलनं सुरक्षा रक्षकांना चकवा देत न्यायालयातूनच पळ काढला. इंडियन मुजाहिद्दीनच्या मीडिया सेलचा अफजल हा प्रमुख कार्यकर्ता आहे. अफजल हा सूरत-अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील सूत्रधार होता. त्याला मुंबई क्राईम ब्रांचने २००८ साली नवी मुंबई येथून अटक केली होती. अफजल उस्मानीसह इंडियन मुजाहिद्दीनच्या २३ सदस्यांवर आरोप निश्चित करण्यात येणार होते. त्यासाठी या सगळ्यांना सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं.
उस्मानी फरार झाल्यानंतर आता या प्रकरणाचंही राजकारण होणार का? अशी शंकाही व्यक्त केली जातेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.