मुंडे यांच्या गाडीला धडक देणाऱ्याला अटक, जामीनावर सुटका
केंद्रीय ग्रामविकास मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या कार चालकाला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Jun 3, 2014, 01:34 PM ISTमुंडे-महाजन कुटुंबासाठी `3` चा आकडा `घातक`
नियतीच्या अजब खेळाचा फटका मराठवाडयाला बसलाय. देशपातळीवर ऐन भरात असतांनाच मराठवाडयाच्या तीन नेत्यांचा मृत्यू झालाय. त्यातच मुंडे-महाजन कुटुंबासाठी 3 हा आकडा घातक ठरलाय.
Jun 3, 2014, 01:29 PM ISTमुंडे यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान?
दिल्लीत मुंडे यांच्या कारला झालेल्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सांगलीचे भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासहीत आणखी काही भाजप नेत्यांनी केलीय.
Jun 3, 2014, 12:45 PM ISTगोपीनाथ मुंडे यांना द्या श्रद्धांजली!
भाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बीडमधील परळीमध्ये आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकुल वातावरण आहे.
Jun 3, 2014, 11:56 AM ISTअशी ही नियती: तीन मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू
गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान तर झालंय, पण मराठवाडा पोरका झालाय... आधी प्रमोद महाजन, मग विलासराव देशमुख आणि आता गोपीनाथ मुंडे... एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या मराठवाड्याच्या या तिन्ही सुपुत्रांनी अचानक एक्झिट घेतल्यानं, हळहळ व्यक्त केली जातेय...
Jun 3, 2014, 10:57 AM ISTगोपीनाथ मुंडे यांना ट्विटरवरून श्रद्धांजली...
`महाराष्ट्राचा लोकनेता` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या अकस्मात निधनानं संपूर्ण महाराष्ट्राच जबर धक्का बसलाय. देश पातळीवर काम केलेल्या मुंडे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेकांनी ट्विटरवर मुंडे यांना श्रद्धांजली वाहिलीय.
Jun 3, 2014, 10:08 AM ISTपंतप्रधान मोदी यांची गोपीनाथ मुंडेना श्रध्दांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुंडे यांना पंतप्रधान मोदी यांनी श्रध्दांजली वाहीली. मुंडेच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झालेय, असं मोदींनी ट्विटरद्वारे श्रध्दांजली वाहली.
Jun 3, 2014, 09:51 AM ISTनाथ्रा ते नवी दिल्ली... मुंडेंचा प्रवास
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठे नेते गोपीनाथ मुंडे यांचं कार अपघातानंतर बसलेल्या तीव्र हृदयविकाराच्या धक्यानं निधन झालंय... एक नजर टाकुयात त्यांच्या कारकिर्दिवर...
Jun 3, 2014, 09:50 AM ISTमहाराष्ट्राचा जनाधार असलेला नेता हरपला
भाजपचे नेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. भीषण अपघातानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा बळी घेतला. भाजपसह महाराष्ट्राला मोठा हादरा बसला आहे. मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने दिल्लीतील हक्काचा आवाज आणि जनाधार असलेला नेता हरपला, अशा भावना व्यक्त होत आहे.
Jun 3, 2014, 09:30 AM ISTगोपीनाथ मुंडे यांचे कार अपघातानंतर निधन
भाजपचे नेते केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले.
Jun 3, 2014, 08:30 AM ISTस्मृति इराणींनंतर आता काँग्रेसचा मोर्चा गोपीनाथ मुंडेंकडे
शैक्षणिक पात्रतेच्या मुद्दय़ावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार टीका करणाऱ्या काँग्रेसनं आता आपला मोर्चा भाजपचे दुसरे मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे वळवला आहे.
Jun 1, 2014, 01:24 PM ISTमुंडेंनी स्वीकारला परम मित्रानं सांभाळलेल्या मंत्रालयाचा पदभार
देशाच्या तिजोरीतून सर्वाधिक निधी संरक्षण मंत्रालयावर खर्च होतो. त्यानंतर क्रमांक येतो तो ग्रामविकास मंत्रालयाचा. तब्बल 77 हजार कोटींचं बजेट असलेल्या या खात्याची सूत्रं खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी स्वीकारली. विशेष म्हणजे मुंडे यांचे परममित्र असलेले विलासराव देशमुख यांनीही अल्प कालावधीसाठी हे मंत्रालय सांभाळलं होतं.
May 28, 2014, 09:08 PM IST`महायुतीला राज्यात ३४ जागा मिळतील`
महायुतीला राज्यात ३४ पेक्षा जास्त जागा मिळतील, असं भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच आपण भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे आदेशही दिले असल्याचं मुंडेंनी म्हटलंय.
May 14, 2014, 04:35 PM ISTदोन्ही काँग्रेसची बैठक, मुंडेची बैठकीवर टीका
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काल तातडीची बैठक झाली. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय आघाडीचे नेते या बैठकीला उपस्थित होते. विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
May 12, 2014, 10:05 AM ISTअजित दादांचं मुंडेंना प्रत्युत्तर, ठाकरे बंधूंना सल्ला!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंच्या टीकेचा समाचार घेतला. `त्यांना पुतण्या सांभाळता आला नाही` त्याला आम्ही काय करणार असंही ते म्हणाले. तर दुसरीकडे "घरातले वाद घरात मिटवा तुमच्या वडे आणि चिकन-सुपनं देशाचे प्रश्न सुटणार नाहीत", असा खोचक सल्लाही अजित पवारांनी राज आणि उद्धव यांना दिलाय.
Apr 20, 2014, 06:04 PM IST