www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय ग्रामविकास मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या कार चालकाला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र आता त्याची 30 हजारांच्या जामीनावर सुटका करण्यात आलीय.
पोलिसांनी गुरविंदर सिंग या चालकाला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलं होतं. 32 वर्षीय गुरविंदर सिंग हा त्याची स्वतःची कार चालवत होता. त्याने मुंडे यांच्या मारुती सुझुकी एसएक्स 4 या कारला मागून धडक दिली. त्याने प्रवासादरम्यान `सिग्नल` तोडला आहे का, याची माहिती पोलीस घेत आहेत.
भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा गुरविंदर सिंग याच्यावर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी एम. के. मीना यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.