वाघिणीचा १० तास ठिय्या, ग्रामस्थांची पाचावर
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे पट्टेदार वाघिणीनं तब्बल १० तास ठिय्या दिल्याने गावक-यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते.
Mar 7, 2013, 06:34 PM ISTघरगुती जाचाला कंटाळलेल्या महिलांवर दलालांची नजर...
चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरातून महिला आणि मुली विकण्याऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. वरोऱ्यातल्या एका महिलेमुळे पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करता आला.
Mar 4, 2013, 10:39 AM ISTफेसबुकवर मैत्री करून दोन अपल्वयीन मुलींवर बलात्कार
फेसबुकच्या माध्यमातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करणा-या पनवेलच्या अल्पवयीन आरोपीला चंद्रपूर पोलिसांनी अटक केलीय.
Feb 10, 2013, 09:52 AM ISTमुख्यमंत्र्यांना महिलांनी घातला घेराव
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याची मागणी करत महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घातला. महिलांचा हा रुद्रावतार बघून मुख्यमंत्र्यांनी एका महिन्याच्या आत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान, डॉ. अभय बंग यांनी सरकारवर टीका केलीय.
Dec 17, 2012, 03:59 PM ISTबाळासाहेब ठाकरेंचं मंदिर उभारणार
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं स्मारक होणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह असलं तरी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मात्र बाळासाहेबांचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतलाय.
Nov 26, 2012, 12:25 AM IST'अल्पवयीन' दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात
चंद्रपूर शहरात घरफोडी करणाऱ्या शाळकरी मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भीक मागण्याचं नाटक करून संधी मिळताच घरफोडी करण्याची त्यांची पद्धत होती. त्या शाळकरी मुलांकडून अडीच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आलेत.
Oct 12, 2012, 09:08 AM IST...अरेरे राज्यातील लोडशेडिंग आणखी वाढणार
दुष्काळाने पिचलेला महाराष्ट्र आता लोडशेडिंगमुळे भरडून निघणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ७ संचापैकी ४ संच बंद पडले आहेत.
Aug 20, 2012, 05:13 PM ISTपारंपरिक अवैध धंदे पोलिसांच्या उठले जीवावर
अवैध धंद्यांविरोधात मोहिम राबवणाऱ्या पोलिसांवरच स्थानिक जमावानं हल्ला केल्याची घटना चंद्रपुरात घडलीय.
Aug 20, 2012, 08:32 AM ISTधाडसी तलाठ्यानं उघड केला कोट्यवधींचा घोटाळा
शासनाचा महसूल वाचविण्यासाठी आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी एका तलाठ्यानं चक्क जिल्हाधिकाऱ्यांचीच तक्रार महसूलमंत्री आणि मुख्य सचिवांना केलीय. शासनाचा पगार घेऊन खाजगी कंपन्यांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या पगारातून बुडालेला महसूल वसूल करावा, अशी मागणीही या तलाठ्यानं केलीय.
Jul 7, 2012, 07:10 PM ISTआदिवासी गावात ज्ञानगंगा...
चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातलं आदिवासीचं एक दुर्लक्षित गाव म्हणजे कोलामगुडा... या गावातील रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण या मूलभूत समस्यांबाबत 'झी २४ तास'नं वारंवार आवाज उठवला. आता पुन्हा एकदा 'झी २४ तास'च्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळं गावात ज्ञानगंगा वाहणार आहे.
Jun 29, 2012, 10:14 AM ISTचितळेही शिकाऱ्यांच्या रडारवर
चंद्रपूरच्या जंगलात वाघांपाठोपाठ आता चितळेही शिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. चंद्रपूर शहराच्या सीमेवरील जुनोना भागातून पोलिसांनी चितळ्यांची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून चितळ्याचे ताजे कातडेही जप्त केले आहे.
Jun 19, 2012, 05:27 PM ISTकोळसा खाणीत कामगाराचा करुण अंत
चंद्रपूर शहरालगतच्या पद्मापूर खुल्या कोळसा खाणीत झालेल्या एका भीषण अपघातात एका कोळसा कामगाराचा करुण अंत झाला. अशोक कांबळे असं या कामगाराचं नाव असून तो कोळसा उत्खनन करणा-या पोकलेन या अवाढव्य मशीनवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.
Jun 2, 2012, 08:16 AM ISTराज ठाकरेंच्या स्वागताला भाजप पदाधिकारी
चंद्रपुरातील ताडोबा दौ-यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी चक्क चंद्रपूरचे भाजप पदाधिकारी पोचले. आपल्या चंद्रपूर दौ-यात राज नागपूरहून थेट दाखल झाले ते ताडोबा जंगलात.
May 31, 2012, 01:00 PM ISTदागिन्यांचा हव्यास, गुन्ह्याकडे प्रवास
दागिन्यांच्या हव्यासापोटी एका सुशिक्षित घरातील तरुणीनं चोरी केल्याची घटना चंद्रपुरात घडली. पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. तिच्याकडून चोरी केलेले दागिनेही हस्तगत करण्यात आलेत.
May 25, 2012, 08:29 AM ISTमनसेला साथ, भाजपला पडली महागात.....
भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात चंद्रपुरात शिवसेनेनं भाजपलाच धक्का दिला आहे. चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.
Apr 29, 2012, 07:27 PM IST