दहशतवादी हल्ला

फ्रान्समध्ये १६० मशीदींना लागणार टाळे?

पॅरिसमध्ये इसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समधील १६० मशीदी पुढील काही महिन्यांसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील दोन मशीदींवर घालण्यात आलेल्या छाप्यामधून जेहादी दस्तावेज हस्तगत करण्यात आले. यामुळे या मशीदी बंद ठेवण्यात येणार आहेत. 

Dec 4, 2015, 12:21 PM IST

रशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी व्हिडिओ व्हायरल

सीरियात असद यांच्या विरोधकांनी एक व्हिडिओ जारी केलाय. लॅटकियात रशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी करतानाचा हा व्हिडिओ आहे. रशियानं केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या प्रतिउत्तरादाखल या हल्ल्याची ही तयारी असल्याचं बोललं जातंय. 

Nov 28, 2015, 07:28 PM IST

भारतावर हल्ल्याची हाफिज सईदची तयारी; पाकची फूस - बीएसएफ

सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) एक धक्कादायक माहिती उघड केलीय. 'जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद भारताच्या सीमेलगत असणाऱ्या क्षेत्रात भेटी देत असल्याचं बीएसएफनं म्हटलंय. 

Nov 27, 2015, 12:32 PM IST

२६/११ हल्ल्यातून आपण काय शिकलो?

२६/११ हल्ल्यातून आपण काय शिकलो?

Nov 27, 2015, 11:37 AM IST

'बुलेट प्रुफ' व्यवस्था मंत्र्यांसाठी तात्काळ... पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर!

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात दहशतवाद विरोधी हल्ल्याचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा सदोष बुलेटप्रुफ जॅकेटमुळे मृत्यु झाला होता. त्यावेळी झालेल्या टीकेनंतर पोलीस दलासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरवली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र हल्ल्याला सात वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आल्याचे दिसत नाही. 

Nov 26, 2015, 04:12 PM IST

'बॉम्ब स्कॉड' पथकाची का उडते त्रेधातिरपीट; माहितीच्या अधिकारात झालं उघड...

मुंबईत एखाद्या ठिकाणी बेवारस वस्तू आढळली तर, आपण लगेच बॉम्ब शोधक पथकाला सांगतो. कारण २६/११ च्या हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या दहशतवादी कारावायांना आळा घालता यावा, याकरता बॉम्बशोधक पथकाला अधिक सक्षम केल्याचा दावा राज्य सरकारनं केला होता. पण माहितीच्या अधिकारात जी बाब  पुढे आली आहे, त्यामुळे राज्य सरकारचा खोटारडेपणा समोर आलाय.

Nov 26, 2015, 01:38 PM IST

२६/११ला सात वर्ष उलटली; पुन्हा हल्ल्याची शक्यता

मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण झालीत. त्या भयंकर अनुभवानंतर मुंबई आज सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेलं शहर आहे. हे पाहता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या अनेक योजना राबवल्या खऱ्या.... पण अजूनही प्रश्न पडतो मुंबई सुरक्षित आहे का?

Nov 26, 2015, 08:44 AM IST

आशियाई परिषदेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट

मलेशिया आणि आणि सिंगापूर दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मलेशियाची राजधानी क्वालालंम्पूरमध्ये दाखल झालेत. या ठिकाणी होणा-या आशियाई परिषदेवरही दहशतवादाचे सावट आहे. महिला आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता आहे.

Nov 21, 2015, 11:55 AM IST

दहशतवादी हल्ला : टेररिस्ट इंश्युरन्स नवा पर्याय

जगभरात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांनी प्रत्येकजण मनातून धास्तावलाय. त्यामुळे टेररिस्ट इंश्युरन्स हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. भारतात टेररिस्ट इंश्युरन्सखाली केवळ ५३० रूपयांत १० लाख रूपयांचं कव्हर मिळू शकेल. पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंश्युरन्स कंपन्या नव्याने या इंश्युरन्सचा प्रचार करायला लागली आहेत. 

Nov 20, 2015, 03:53 PM IST

पॅरीस हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्देल हमिद याला कंठस्नान

पॅरीस हल्ल्याचा संशयित मास्टरमाईंड अब्देल हामिद अबाऊद याला ठार करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांच्या छाप्यादरम्यान मारल्या गेलेल्या लोकांमध्ये अब्देल याच्या मृतदेहाची ओळख पटलीय.

Nov 19, 2015, 08:50 PM IST

VIDEO : पॅरीस हल्ला; दु:खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना!

पॅरीस हल्ल्यात दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्यात शिकार ठरलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देताना एका कॉन्सर्टमध्ये पॉप गायिका मॅडोना दु:खान स्टेजवरच कोसळली.

Nov 16, 2015, 06:21 PM IST

पॅरीस हल्ला; दु:खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना!

खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना!

Nov 16, 2015, 05:43 PM IST

पॅरिसनंतर तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलीस जखमी

तुर्कस्तानातल्या अंतल्यामध्ये जी-२० परिषद ISISच्या टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय. आज ही परिषद सुरू होत असतानाच दक्षिण तुर्कस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला झालाय. 

Nov 15, 2015, 05:24 PM IST

VIDEO : शांतीनं जगू देणार नाही, इसिसनं दिली धमकी

 इसिस सध्या जागतिक धोका बनत चालल्याचं दिसतंय. फ्रान्सवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसनं घेतलीय. आतपर्यंत इसिसनं अकरा देशांवर आत्मघाती हल्ले केलेत.

Nov 14, 2015, 07:30 PM IST