दिल्ली पोलीस

आंदोलनकर्ते योगेंद्र यादव पोलिसांच्या ताब्यात

येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणारे स्वराज अभियानेच नेते योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी यादव यांना नोटीस पाठवून मैदान खाली करण्याचे बजावले होते. मात्र, आंदोलन सुरु असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Aug 11, 2015, 12:45 PM IST

दहशतवादी संघटनांचा दिल्लीवर ड्रोन हल्ल्याचा प्लान- गुप्तचर यंत्रणा

लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटना दिल्लीवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. 

Apr 28, 2015, 11:11 AM IST

राहुल गांधी यांची चौकशी सर्वसामान्य : दिल्ली पोलीस

दिल्ली पोलिसांची ही चौकशीची प्रक्रिया सर्वसामान्य असल्याचा खुलासा, दिल्लीच्या पोलीस आयुक्त बी एस बस्सी यांनी केला आहे. या चौकशीचा केंद्र सरकार तसंच केंद्रीय गृहमंत्रालयाचा काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

Mar 14, 2015, 05:45 PM IST

सुनंदा 'हत्या' प्रकरणात मेहर तरार यांच्या चौकशीची शक्यता

सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांची एसआयटी टीम पाकिस्तान पत्रकार मेहर तरार यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. 

Mar 12, 2015, 04:45 PM IST

आयपीएलच्या बाजूनं शशी थरूर यांची पुन्हा चौकशी होणार

माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूबाबात पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता दिल्ली पोलीस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी व्यक्त केली आहे.

Jan 21, 2015, 09:45 AM IST

सुनंदा मृत्यू प्रकरण : FIR बाबत काँग्रेसचं आश्चर्य

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणावरुन काँग्रेस भाजपमध्ये आरोप - प्रत्त्यारोपाचं राजकारण सुरु झालंय. मृत्यूनंतर एका वर्षानं पोलिसांनी F I R दाखल केल्याबद्दल, काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलंय.

Jan 6, 2015, 06:52 PM IST

पोलिसांना पाठवत होता पॉर्न व्हिडिओ

 दिल्ली पोलिसांना व्हॉट्स अॅपवर पॉर्न व्हिडिओ पाठविणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीआहे. भ्रष्टाचाराविरोधात सुरू करण्यात आलेल्या नंबरवर हे पॉर्न व्हिडिओ पाठविण्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. 

Aug 21, 2014, 05:59 PM IST

आप नेते आशुतोष, शाझिया इल्मी पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयाबाहेरील गोंधळ प्रकरणी आप नेते आशुतोष यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
बुधवारी भाजपच्या कार्यालयाबाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती.

Mar 6, 2014, 04:22 PM IST

दिल्लीत हाय अलर्ट जारी

जमात उद दवा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख आणि २६-११च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदनं लाल किल्ल्यावर हल्ल्याची धमकी दिलीये. त्यामुळे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

Aug 10, 2013, 08:18 AM IST

दिल्लीत १७ वर्षीय तरूणीवर गोळ्या झाडल्या

दिल्लीत दोन युवकांनी एका १७ वर्षीय तरूणीवर गोळी झाडली. यामध्ये ही तरूणी गंभीर जखमी झाली. तिला एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Aug 7, 2013, 12:40 PM IST

भाव एक रुपया! पाक, दुबईतील फोन्स बंद

सट्टेबाजीमुळे क्रिकेट विश्व ढवळून निघाले. दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी सट्टेबाजांना पकडण्यास व्युहरचना केली. काही हाती लागले तर काही भूमिगत झाले. त्यांचा कारनामा सुरूच होता. पाकिस्तान आणि दुबईमार्फत सट्टा लावला जात होता. मुंबईत पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या टीम काळबादी येथे फिल्डिंग लावली. मात्र, त्याने भाव एक रूपया, असे म्हणताच पाक, दुबईतील फोन क्षणात बंद झालेत.

Jun 12, 2013, 10:39 AM IST

हनीमूनला नाही पुन्हा तरुंगात गेला अंकीत!

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी क्रिकेटर अंकित चव्हाण पुन्हा एकदा तुरुंगात जाण्यासाठी गुरुवारी पहाटेच दिल्लीला रवाना झाला.

Jun 6, 2013, 02:28 PM IST

शरद पवारांवर किती गुन्हे, दिल्ली पोलिसांची विचारणा

महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मोठ व्यक्तीमत्व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, अशी विचारणा दिल्लीतील पोलिसांनी केलीय. मात्र, ही माहिती कशासाठी हवीय त्याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Mar 13, 2013, 11:58 AM IST

दिल्ली पोलिसांकडून मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

दिल्ली बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीच्या मित्राची मुलाखत दाखवल्यामुळं दिल्ली पोलिसांनी `झी न्यूज`विरोधात गुन्हा दाखल करुन प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या या कृतीचा राज्यभर निषेध केला जातोय. झी २४ तासचे पत्रकार काळ्या फिती लावून काम करत आहेत.

Jan 6, 2013, 02:34 PM IST

टीम अण्णांचा उपोषणाचा मार्ग मोकळा

अखेर टीम अण्णांच्या उपोषणाला परवानगी देण्यात आलीय. अण्णांना दिल्लीत जंतरमंतरवर २५ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान उपोषण करण्याची परवानगी दिली गेलीय. यापूर्वी पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

Jul 7, 2012, 09:32 PM IST