www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सट्टेबाजीमुळे क्रिकेट विश्व ढवळून निघाले. दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी सट्टेबाजांना पकडण्यास व्युहरचना केली. काही हाती लागले तर काही भूमिगत झाले. त्यांचा कारनामा सुरूच होता. पाकिस्तान आणि दुबईमार्फत सट्टा लावला जात होता. मुंबईत पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या टीम काळबादी येथे फिल्डिंग लावली. मात्र, त्याने भाव एक रूपया, असे म्हणताच पाक, दुबईतील फोन क्षणात बंद झालेत.
काळबादेवीमध्ये रमेश व्यास, अशोक व्यास आणि पांडुरंग कदम हे तिघे सट्टा घेत होते. त्याचवेळी काळबादेवी येथे १४ मे रोजी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचची टीम फिल्डिंग लावून होती. रमेश व्यास या सट्टेबाजाला अटक करण्यासाठी होती. मात्र, त्याला पोलिसांची कुणकुण लागलीच. त्यांने चलाकी दाखवत, भाव एक रुपया! असे तो म्हणाला अन् क्षणार्धात दुबई आणि पाकिस्तानातील फोन्सच्या ३२ लाइन ठप्प झाल्या.
बुकी रमेश व्यास मुंबई पोलिसांना सापडला. मात्र, त्याने भाव एक रूपया म्हणताच. पण जाळे टाकून बसलेले दिल्ली पोलीस लाइन बंद झाल्याने अॅलर्ट झाले. दुसर्यासच दिवशी मुंबईत छापा टाकून बडे मासे पकडले. रमेश व्यास हा देशातील तसेच परदेशातील अनेक बड्या बुकींच्या संपर्कात होता. १४ मे रोजी रमेश व्यास याच्यासह तिघांना अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी ९२ मोबाईल जप्त केले. त्यापैकी ३२ मोबाईल दुबई आणि पाकिस्तानातील बुकींशी बोलण्यासाठी वापरले जात होते, हे चौकशीत पुढे आलेय.
नवी दिल्ली पोलीसदेखील एप्रिलपासून बुकी आणि खेळाडूंच्या मागावर होते. परदेशातील फोन लाइन्स चालू असल्याने आयपीएल स्पर्धेनंतर त्यांना कारवाई करायची होती. ३२ फोन लाइन्समुळे दिल्ली पोलीसही बुकी आणि खेळाडूंच्या मागावर होते. पण क्राइम ब्रँचच्या अधिकार्यां नी पकडताच ‘भाव एक रुपया’ असे रमेश व्यास ओरडला आणि या कोडवर्डने संपूर्ण ३२ लाइन्स ठप्प झाल्या.
दरम्यान, मुंबई पोलीस मोठी कारवाई करू नयेत म्हणून दुसर्यालच दिवशी दिल्ली पोलिसांनी मुंबईत छापा टाकून श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना पकडल्याचे क्राइम ब्रँचच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.