निरोगी आयुष्यासाठी झोप ही खूप महत्त्वाची असते. नवजात बाळापासून वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांना पुरेशी झोप घेणं आवश्यक असतं. कमी झोपमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. कमी झोप ही अनेक रोगाचं कारण असतं. असं म्हणतात की वयानुसार झोप कमी कमी होत जाते. पण तज्ज्ञ म्हणतात वयानुसार आपल्याला किती झोप महत्त्वाची हे जाणून घेणं खूप महत्त्वाच आहे. वयानुसार झोपेचे मापदंड निश्चित केले आहेत. चला तर जाणून घेऊयात वयानुसार झोप किती हवी पाहूयात.
या प्रकरणात, निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. रमाकांत शर्मा म्हणतात की, सामान्यतः एखाद्या व्यक्तीला 7 ते 9 तासांची झोप घेणे गरजेच आहे. पण झोपेची गरज देखील वयानुसार वाढत आणि कमी होत असते. यासाठी वयानुसार एक पॅरामीटर निश्चित केलं गेलं आहे.
तज्ज्ञ सांगतात की, झोपेच्या कमतरतेमुळे ताणतणाव, डोकेदुखी, मायग्रेन, विसरणे इत्यादी अनेक समस्या माणसाला ग्रासतात. जास्त तणावामुळे थायरॉईड आणि हार्मोनल समस्यांचा धोका वाढतो. चांगली झोप तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते. तर चांगल्या झोपेमुळे आरोग्यास अनेक फायदे मिळतात. चांगली झोप मिळाल्यास मानसिक आरोग्य निरोगी राहतं. चांगली झोप झाल्यास तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. यामुळे तुमचा ताण कमी होतो आणि हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.
कमी झोप घेतल्याने आपल्या चयापचयावर परिणाम होत असल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा हा अनेक आजारांचे मूळ मानले गेले आहे. त्यामुळे मधुमेह टाइप-2, उच्च रक्तदाब इत्यादींचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, आपण असे म्हणू शकतो की चांगली झोप घेतल्याने आपण लठ्ठपणाचा धोका आणि त्यामुळे होणाऱ्या सर्व समस्येपासून तुम्ही दूर राहू शकता.
जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेता तेव्हा तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे करता. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)