Success Story: राजस्थानच्या गौरव सिंह शेखावतने मागच्या आठवड्यात लागलेल्या जेईई मेन्समध्ये 99.44 टक्के मिळवून संपूर्ण गावाचे नाव रोशन केले. कोटामध्ये स्पर्धा परीक्षार्थींची गर्दी पाहता त्याच्या आईवडिलांनी तिथे न पाठवण्यातच समजदारी मानली. यानंतर गौरवने झुंझुन येथूनच आपल्या जेईईची तयारी केली. मुलाला साथ देण्यासाठी वडील स्वत:त्याच्या सोबत येऊन राहिले. गौरवच्या परिवाराकडून अनेक गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत.
माझ्या शिक्षणादरम्यान वडिलांनी वारंवार मला प्रोत्साहन दिले. स्वत:ला त्रास देऊन काही होणार नाही. मेहनत कर तरच यश मिळेल असे माझे वडील मला वारंवार सांगायचे. मलाच नव्हे तर माझी बहीण वर्षालादेखील वडिलांनी तिच्या NEET परीक्षेसाठी खूप सहकार्य दिले. यामुळेच आज त्यांची दोन्ही मुले डॉक्टर आणि इंजिनीअर बनण्याच्या काही पावले दूर आहेत, असे गौरव आपल्या वडिलांबद्दल सांगतो.
गौरवचे वडील विजय सिंह शेखावत सांगतात की, 'सुरुवातीला मी माझ्या पत्नीला शिकवायचो. तेव्हा समाज मला टोमणे मारायचा. पण कोणाचेच ऐकले नाही. मग मुलीकडून नीट परीक्षेची तयारी करुन घेतली आणि त्यात ती यशस्वी झाली. यानंतर मुलाकडून जेईईची तयारी करुन घेतली. ज्यात त्याने खूप चांगला निकाल दिला.'
मी जेव्हा पहिल्यांदा नांगर हाती पकडला तेव्हा तो योग्य पद्धतीने चालवू शकत नव्हतो. तेव्हा ते उदास झाले. नांगर नीट पकडत नाही, हा आयुष्यात काय करेल? आपल्या परिवाराचे पोट कसे भरणार?' असे ते माझ्या आईला विचारत होते. पण आज विजयसिंह शेखावत संपूर्ण गाव आणि समाजासाठी एक प्रेरणा बनले आहेत.
विजयसिंह शेखावत सांगतात, 'माझ्या आई-वडिलांना शिक्षणाचे महत्व माहिती नव्हते. मी घरी बसून शांतपणे अभ्यास करायचो. माझे आई-वडील दोघेही अशिक्षित होते. शिक्षण घेऊन आयुष्य बदलेल हे त्यांना माहिती नव्हते. शिकून छोटी मोठी नोकरी केली तर शेती कोण करणार? असे त्यांना वाटायचे'.
12 वीनंतर मुलाला कोटाऐवजी झुंझुनमध्ये शिकायला पाठवलं. मी मुलासोबत राहायचो. एकटे राहिल्याने मुलं तणावात येतात. त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही, असे मी मुलांना सांगत असायचो. खासकरुन मी मुलीला शिकवलं की शिकून स्वत:च्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे. मुलीने 2024 मध्ये नीट परीक्षा उत्तीर्ण केली. मी आयुष्यातील मोठी लढाई जिंकल्याचा आनंद मला त्यादिवशी झाल्याचे विजयसिंह सांगतात. आज गावात माझी एकमेव मुलगी आहे जी डॉक्टर होणार आहे. कोणतीच महिला नोकरी करत नव्हती तेव्हा माझी बायको कामाला जाऊ लागली होती. समाजाप्रती आपली मोठी जबाबदारी असल्याचे, विजयसिंह आपल्या मुलांना सांगतात.