धोनी

मॅक्सवेल हा सचिन आणि सहवाग सारखाच - धोनी

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांच्यात तुलना केली आहे.

May 8, 2014, 12:45 PM IST

आयपीएल फ्रँचायझींना प्रायोजक मिळेना!

विविध वाद-अडचणींवर मात करत इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) सातवे पर्व बुधवारपासून सुरू होत आहे. मात्र विविध वादांची किनार, संघांचे बदलते स्वरूप, निवडणुकांमुळं संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणारा पहिला टप्पा या घटकांमुळे प्रायोजकांनी फ्रँचायझींकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट चित्र आहे.

Apr 15, 2014, 03:58 PM IST

`धोनी` आणि `भज्जी`ने केली `युवी`ची पाठराखण

बांगला देशातील मीरपूर येथे झालेल्या ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत पराभूत झाला, याचं कारण युवराज असल्याचं म्हटलं जात आहे.

Apr 7, 2014, 09:40 AM IST

भारताचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेनं जिंकला टी-२० वर्ल्डकप

दुसऱ्यांदा टी-२0वर्ल्ड कप जिंकण्याच टीम इंडियाचं स्वप्न भंगलंय. बांग्लादेशमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला ६ विकेट्सनं पराभूत करत श्रीलंकेनं टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली आहे.

Apr 6, 2014, 10:24 PM IST

युवराजला सिद्ध करण्याची हीच वेळ योग्य – धोनी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये युवराज सिंगनं पुन्हा एकदा विश्वास कमावलाय, असं भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं म्हटलंय.

Mar 31, 2014, 01:02 PM IST

टी-२० वर्ल्डकप: आज भारत वि. ऑस्ट्रेलिया संडे ट्रीट

टी-२० वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही संडे ट्रीट क्रिकेट रसिकांना पाहयला मिळणार आहे. साखळी फेरीतली टीम इंडियाची ही शेवटची लढत आहे. मात्र या लढतीपूर्वीच टीम इंडियाचे सेमी फायनलमधलं स्थान जवळपास निश्चित झालंय.

Mar 30, 2014, 10:36 AM IST

टी-२० वर्ल्डकप: टीम इंडिया सरावातही ‘फेल’

टीम इंडियाची पराभवाची मालिका सराव मॅचमध्येही सुरूच राहिली. आशिया चॅम्पियनशीपचे विजेत्या श्रीलंकन टीमनं टी-२० वर्ल्डकपच्या प्रॅक्टिस मॅचमध्येही टीम इंडियाला हरवलं. टीम इंडियाला ५ रन्सनं मॅच गमवावी लागली. लसिथ मलिंगाच्या प्रभावी मार्‍यासमोर भारतीय बॅट्समनचा निभाव लागला नाही.

Mar 18, 2014, 10:38 AM IST

बांग्लादेशमध्ये आजपासून टी-२०चा थरार!

२०-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होतेय. बांग्लादेशमध्ये होतं असलेल्या या वर्ल्डकपमध्ये आजपासून पात्रता फेरीच्या लढती सुरु होतं आहे. सलामीची लढत यजमान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये होतं आहे.

Mar 16, 2014, 09:23 AM IST

टीम इंडियाची मदार आता मुंबईकर क्रिकेटपटूंवर!

ऑकलंड टेस्टच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं पकड मजबूत केली आहे. अंधूक प्रकाशामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारत ४ विकेट्स गमावत १३० रन्सवर खेळत होता. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया ३७३ रन्सनं पिछाडीवर आहे.

Feb 7, 2014, 02:03 PM IST

परदेशात टीम इंडिया फेल, सीरिज गमावली

वेलिंग्टन वन-डेत न्यूझीलंडनं भारतावर ८७ रन्सनं मात केली आहे. या पराभवासह भारतानं पाच वन-डे मॅचेसची सीरिज ०-४नं गमावली. भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक ८२ रन्स केले. बॉलर्स आणि बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं भारतीय टीमला या सीरिजमध्ये किवींसमोर सपशेल लोटांगण घालावं लागलं.

Feb 1, 2014, 08:27 AM IST

आम्ही पुन्हा त्याच चुका केल्या- धोनी

टीम इंडियाचा कर्णधार पराभवावर मोकळेपणाने बोलला आहे, आमच्या टीमने नको त्या चुका, पुन्हा-पुन्हा केल्याने आमचा पराभव झाल्याचं कर्णधार धोनीने म्हटलं आहे.

Jan 28, 2014, 09:51 PM IST

<B> <font color=red>LIVE Scorecard -</font></b>भारत वि. न्यूझीलंड पहिली वनडे

भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. २०१४ चा वन-डे क्रिकेट सीझन टीम इंडियासाठी ड्रीम सीझन ठरला. मात्र, सीझनचा शेवट भारतीय टीमला विजयानं करता आला नाही. आता २०१४ चा क्रिकेट सीझन धोनी अँड कंपनीसाठी नवी आव्हानं घेऊन आला आहे. आणि यामध्ये टीम इंडियाला दोन हात करावे लागणार आहेत ते न्यूझीलंडच्या टीमसाठी. २०१५ वर्ल्ड कप पूर्वी धोनीच्या यंगिस्तानसाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर टीम इंडियानं सपशेल लोटांगण घातलं होतं. त्यामुळं किवी दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं भारतीय टीमसमोर असणार आहे.

Jan 19, 2014, 08:16 AM IST

टीम इंडियानं वनडेनंतर टेस्ट सीरिजही गमावली

डर्बन टेस्टमध्ये टीम इंडियाला मानहानीकारक पराभवाला सामोर जाव लागलं आहे. सेकंड इनिंगमध्ये भारतीय टीम इनिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मायदेशात शेर ठरलेले भारतीय बॅट्समन आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर ढेर ठरले.

Dec 30, 2013, 09:40 PM IST

किंग खानने टाकले धोनीला मागे!

बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान हा देशातला सर्वात पॉवरफुल सेलिब्रेटी ठरला आहे. फोर्ब्स इंडिया २०१३ च्या सर्वात ताकदवर सेलिब्रेटींच्या यादीत किंग खानला लागोपाठ दुसऱ्यांदा हा सन्मान प्राप्त झाला आहे. ४८ वर्षीय किंग खानला हा सन्मान त्यांच्या सुपर हिट चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या यशामुळे आणि लोकप्रियेतामुळे मिळाला आहे.

Dec 17, 2013, 08:01 PM IST

धोनीचा भाऊ गेला समाजवादी पक्षात

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा मोठा भाऊ नरेंद्रसिंह धोनी यांनी रविवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला.

Dec 16, 2013, 08:41 PM IST