नवरात्री

व्हिडिओ: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी लिहिलं देवीचं गाणं

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांग्ला भाषेत एक आध्यात्मिक गाणं लिहिलंय. ममता बॅनर्जी यांनी हे गाणं दुर्गा मातेला समर्पित केलंय. ममतांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आणि हे गाणं जगातील सर्व मातांना समर्पित केलं.

Oct 14, 2015, 10:08 PM IST

प्रभादेवीत साकारलंय तंजावरचं बृहदीश्वर मंदिर

प्रभादेवी इथल्या धनमिल नाक्याची महालक्ष्मी यंदा तंजावरच्या हजारो वर्षे पुरातन अशा बृहदीश्वर मंदिरात विराजमान झाली आहे. क्षणाक्षणाला बदलणारी मंदिराची रोषणाई पहिल्या दिवसांपासूनच देवीभक्तांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरतेय. 

Oct 14, 2015, 05:02 PM IST

नवरात्री पहिला दिवस : माता शैलपुत्रीची आराधना देईल आरोग्य

नवरात्रीचा उत्साह आजपासून सुरू झाला आहे, पहिल्या दिवशी माता शैलपुत्री म्हणजेच निसर्ग देवतेचं रूप असलेली ही देवी आहे. देवीच्या नऊ रूपांपैकी एक शैलपुत्री आहे, देवीला पार्वती देखील म्हटलं जातं.

Oct 13, 2015, 01:57 PM IST

पाहा नवरात्रीचे ९ शुभ मुहूर्त, ९ दिवसात भाग्योदय

१३ ऑक्टोबरपासून सुरू नवरात्रौत्सवाचे ९ शुभ मुहूर्त आहेत. या नऊ दिवसांमध्ये ग्रह आणि नक्षत्रांचा असा शुभ संयोग आहे ज्यामुळं तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. 

Oct 12, 2015, 04:50 PM IST

नवरात्रौत्सव: फुलांचे भाव वाढले, बाजारपेठा गर्दीनं फुलल्या

नवरात्रीत फुलांचं मुख्य आकर्षण असल्यानं सगळ्या बाजारपेठा सध्या झेंडू, शेवंती, अस्टर, निशीगंध अशा विविध फुलांनी बहरल्या आहेत. पावसाळा लांबल्याचं निमित्त सांगून विक्रेत्यांनी या वर्षीही फुलांच्या किमतीत वाढ केल्याचं दिसतंय. 

Sep 25, 2014, 07:58 AM IST

सर्व मांगल मांगल्ये! घटस्थापनेसाठी मुहूर्त १० पर्यंतच!

आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवदुर्गांच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीनिमित्त संपूर्ण देशातच उत्साहाचं वातावरण आहे. देशातील सर्व शक्तीपिठांमध्ये रोषणाई करण्यात आलीय. राज्यातील साडेतीन शक्तीपीठांसह सर्व शहरांमध्येच देवीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी, देवीची आराधना करण्यासाठी सर्वच सज्ज झालेय. 

Sep 25, 2014, 07:45 AM IST

अमेरिकेत जाणार पण, ओबामांसोबत जेवणार नाही पंतप्रधान मोदी

व्हाइट हाऊसमध्ये प्रायव्हेट डिनर आणि अमेरिकेत भारतीय राजदूताकडून दिलं जाणाऱ्या रिसेप्शनचा मेन्यू तयार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर काही खाणार नाहीयेत. पाच दिवसांमध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी नवरात्रीचा उपवास करणार आहे. याबद्दलची एक बातमी इंग्रजी वृत्तपत्रानं दिलीय. 

Sep 22, 2014, 11:15 AM IST

मंदिरात चेंगराचेंगरी, मृतांची संख्या १०९!

मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील रतनगड मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत कमीत कमी १०९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसंच १०० हून धिक भाविक जखमी झाले आहेत.

Oct 14, 2013, 08:45 AM IST

मंदिरात चेंगराचेंगरी, ७५ जण ठार

मध्यप्रदेशातील दातिया जिल्ह्यात रतनगढ माता मंदिराबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 64 जण ठार झालेत तर 100 हून अधिक जण जखमी झालेत.

Oct 13, 2013, 05:19 PM IST

राज्यात सर्वत्र नवरात्रीची धूम

राज्यात सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात अष्टमी आणि नवमीच्या स्वागतासाठी फुलांची उधळण सुरु आहे. शेतात ठिकठिकाणी पिवळ्या आणि नारिंगी रंगाच्या झेंडूनी शेती बहरली आहे. जणू काही नवरात्रीनिमित्त भूमातेनेही फुलांचा साज परिधान केला आहे.

Oct 12, 2013, 11:54 AM IST

नवरात्रीसाठी सजतंय महालक्ष्मीचं मंदिर

नवरात्रोत्सव आवघ्या काही दिवसावर येवुन ठेपलाय. त्यामुळं साडेतीन शक्तीपिठापैकी एक महत्वाचे पीठ असणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु झालीय.

Sep 24, 2013, 07:18 PM IST

तिरू`पती`कडून पत्नी महालक्ष्मीला शालू भेट

नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी देवस्थानकडून कोल्हापुरच्या महालक्ष्मीसाठी शालू अर्पण करण्यात येतो. यंदाही श्री महालक्ष्मीच्या चरणी तिरुपतीचा शालू अर्पण करण्यात आला.

Oct 22, 2012, 03:23 PM IST

मुंबईच्या दांडियात पोलिसांचे दांडुके

मुंबईच्या खार भागातल्या रहिवाशांना पोलिसांच्या दंडुकेशाहीचा अनुभव आला. सध्या मुंबईत ठिकठिकाणी नवरात्रानिमित्त गरबा दांडिया सुरु आहेत रात्री दहा पर्यंत लाऊडस्पीकर लावून दांडिया खेळण्यास परवानगी आहे तर 12 पर्यंत लाऊडस्पीकर शिवाय दांडिया खेळता येतो.

Oct 21, 2012, 12:23 PM IST