मंदिरात चेंगराचेंगरी, मृतांची संख्या १०९!

मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील रतनगड मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत कमीत कमी १०९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसंच १०० हून धिक भाविक जखमी झाले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 14, 2013, 08:45 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील रतनगड मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत कमीत कमी १०९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसंच १०० हून धिक भाविक जखमी झाले आहेत. रविवारी रात्री १०९ प्रेतांचं शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मृतांमध्ये बालकं आणि महिलांची संख्या अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची न्यायालयिन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंडुला देवीचं हे मंदिर असून आज दस-यानिमित्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक जमा झाले होते. दरम्यान या मंदिराजवळील सिंध नदीच्या पुलावर चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे काही भाविकांनी पाण्यात उड्या मारल्या. एका तरुणांच्या टोळीने लवकर दर्शन मिळावं म्हणून पुल तुटायला आल्याची अफवा पसरवल्यानं या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधीकारी, पोलीस अधिक्षक आणि स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.